फाॅक्सकाॅनपाठोपाठ एअरबसचा महाराष्ट्राला ‘टाटा’ : 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला

मुंबई तक

• 03:00 PM • 27 Oct 2022

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला ‘टाटा एअरबस’ हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. C-295 […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला ‘टाटा एअरबस’ हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

काय आहे टाटा एअरबस प्रकल्प?

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295 एमडब्लू विमान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी याबाबतचा करारही करण्यात आला. या कराराअंतर्गत, 16 विमाने तयार अवस्थेमध्ये तर 40 विमानं भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), नेतृत्वाखाली भारतात तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो, असं संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं होतं.

उदय सामंत यांनी प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचं सांगितलं होतं :

वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित झाल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरापूर्वी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प नागपूरला ‘मिहान’मध्ये होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र नागपूरला होणारा हा प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    follow whatsapp