New Labour Code: तीन दिवस सुट्टी, पुरुष-महिलांना समान वेतन, पीएफ अधिक आणि बरच काही…

मुंबई तक

• 08:53 AM • 11 Sep 2022

केंद्र सरकार देशात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. नोकरदार लोकांचे वर्किंग लाईफ बदलण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, देशात नवीन कामगार संहिता कधी लागू होणार? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याची आगामी काळात अंमलबजावणी होणार हे निश्चित आहे. नवीन संहिता लागू झाल्यानंतर कामगारांच्या साप्ताहिक रजेपासून ते पगारदारांच्या पगारात […]

Mumbaitak
follow google news

केंद्र सरकार देशात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. नोकरदार लोकांचे वर्किंग लाईफ बदलण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, देशात नवीन कामगार संहिता कधी लागू होणार? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याची आगामी काळात अंमलबजावणी होणार हे निश्चित आहे.

हे वाचलं का?

नवीन संहिता लागू झाल्यानंतर कामगारांच्या साप्ताहिक रजेपासून ते पगारदारांच्या पगारात बदल होणार आहे. कंपन्यांना त्यांच्या कामाचे धोरण बदलावे लागेल. लवचिक कामाची ठिकाणे आणि लवचिक कामाचे तास या भविष्यातील गरजा आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले.

चार नवीन लेबर कोड येणार

केंद्र सरकारची इच्छा आहे की सर्व राज्यांनी नवीन कामगार संहिता एकाच वेळी लागू करावी. ही संकल्पना लोकांचे वैयक्तिक आयुष्य आणि काम यांच्यात समतोल साधण्यासाठी आणली जात आहे. सरकार चार नवीन कोड आणणार आहे, त्यामध्ये नवीन कामगार संहिता वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यांच्याशी संबंधित आहेत.

3 दिवस सुटी देण्याबाबत चर्चा

नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असलेला बदल म्हणजे तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी. नव्या लेबर कोडमध्ये तीन सुट्या आणि चार दिवस कामाची तरतूद आहे. मात्र, कामाचे तास वाढणार आहेत. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये 12 तास काम करावे लागेल. एकूण, तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावे लागेल. यानंतर तुम्हाला तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे.

सुट्यांच्या बाबतीत मोठा बदल होणार

याशिवाय सुट्यांच्या बाबतीतही मोठा बदल होणार आहे. यापूर्वी कोणत्याही संस्थेत दीर्घकालीन रजा घेण्यासाठी वर्षातून किमान 240 दिवस काम करणे आवश्यक होते. परंतु नवीन कामगार संहितेनुसार तुम्हाला 180 दिवस काम करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्ही दिर्घकालीन रजेवर जाऊ शकता.

हातातील येणार पगार कमी होणार

नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर, टेक होम सॅलरी म्हणजेच हातातील पगार तुमच्या खात्यात पूर्वीपेक्षा कमी येणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा, अशी तरतूद सरकारने नव्या नियमात केली आहे. जर तुमचा मूळ पगार जास्त असेल तर पीएफ योगदान वाढेल. सरकारच्या या तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. यासोबतच ग्रॅच्युइटीचे पैसेही अधिक मिळतील. त्यामुळे त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे.

पुरुष आणि महिलांना समान वेतन

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडेच सांगितले की आम्ही जुन्या कायद्यांचे तर्कसंगतीकरण केले आहे. तसेच पुरुष आणि महिला दोघांनाही न्याय्य वेतन सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक सुरक्षा आणि वेतन मानकांचा विचार केला आहे. ते म्हणाले की 29 विविध कायद्यांचे चार नवीन कामगार संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

    follow whatsapp