Crime News : एका महिलेची तिच्याच दोन मुलांनी गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, हत्या करणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा हा अल्पवयीन असल्याचं समजतंय. या घटनेच्या काही तासांतच दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधित प्रकरणात गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. ही घटना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील नखतराणा तालुक्यातील नाना कडिया गावातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा: मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचं थैमान, तांत्रिक बिघाडामुळे मनोरेल बंद, 'एवढे' प्रवासी अडकले
नेमकं काय घडलं?
एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, संपूर्ण कुटुंब हे शेतात मजुरीचं काम करायचं. जेव्हा ही घटना घडली त्याच रात्री, शेतमालकाने पीडितेच्या वडिलांना फोनद्वारे संपर्क साधत हत्येबाबत माहिती दिली. जेव्हा मृत महिलेचे वडील घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आपली मुलगी मृतावस्थेत पडल्याचं त्यांनी पाहिलं. तेव्हा मृत महिलेचा गळा दाबल्याच्या खूना होत्या.
आईला फोनद्वारे संपर्क अन्....
पोलिसांनी तपास केला असता, हत्या करणाऱ्यापैकी, एक मुलगा अल्पवयीन आहे. तर एकाचं वय हे 19 असे आहे. तर धाकट्या मुलगा अल्पवयीन आहे. त्यांनी आरोप केला की, आई ही रात्री उशिराने फोनवर कोणाशी तरी बोलत होती. यामुळे घरत तिचं फार कमी लक्ष होतं, ती जबाबदाऱ्या पार पाडत नव्हती. अशा परिस्थितीत शनिवारी रात्री उशिराने जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला पुन्हा फोनद्वारे संपर्क केला असता, दोघांनीही गळा दाबत संपवलं.
पीडितेचा पती कामानिमित्त बाहेर अन् दोन मुलांनीच...
संबंधित प्रकरणात पोलीस अधिकारी ए.एम मकवाना यांनी सांगितलं की, महिलेचा विवाह हा 20 वर्षापूर्वी झाला होता. तिला पती गुरांचा सांभाळ करायचा. हत्येदरम्यान पीडितेचा पती कामानिमित्ताने बाहेर गेला होता. गेल्या काही महिन्यापासून महिला काही महिन्यांपासून तिच्या पतीपासून अंतर ठेऊ लागली होती. त्यामुळे तिच्याच मुलांना आपल्या आईवर संशय घेतला. त्यानंकर आईचीच हत्या करून मुलं रात्रभार शेतात थांबले होते.
हे ही वाचा: ऐकावं ते नवलंच! साताऱ्यात महिलेला सात बाळ, एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म, डॉक्टरही चक्रावले
या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 103 (1), 54 तसेच इतर तरतुदीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय दोन्ही आरोपींची चौकशी सुरुच आहे.
ADVERTISEMENT
