Crime News : पश्चिम बंगालच्या मालदा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या 24 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्यानीचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. या मृत्यूनंतर ज्युनिअर डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या कुटुंबाने आरोप केला की, तिचा प्रियकर उज्ज्वल सोरेनही मृत्यूत सहभागी होता. संबंधित प्रकरणात सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऐकावं ते नवलंच! साताऱ्यात महिलेला सात बाळ, एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म, डॉक्टरही चक्रावले
धक्कादायक प्रकरण आला समोर
संबंधित प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, उज्ज्वल सोरेन हे मूळचे पश्चिम बंगाल येथील पुरुलिया जिल्ह्यातील रहिवासी आहे, त्याचा फोन लोकेशनवरून शोध घेण्यात आला आहे. संबंधित घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याची चौकशी केली.
मलादा येथील मेडिसकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टर उज्ज्वल सोरेन यांचे कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलीसोबत एका वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. पीडितेच्या आईनं सांगितलं की, या नात्यादरम्यान तरुणी गर्भवती राहिली आणि नंतर तिचा गर्भपात करण्यात आला होता.
नंतर पीडितेच्या आईने सांगितलं की, मुलीने आणि उज्ज्वलने एका मंदिरात विवाह केला. जेव्हा तिने कोर्ट मॅरेजता आग्रह धरला गेला तेव्हा तिला तो अनेकदा टाळू लागला होता. प्राथमिक तपासातून असे आढळून आले की, एमबीबीएस विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ड्राग्ज ओव्हरडोज असू शकते.
पीडितेच्या आईने सांगितली कहाणी
गेल्या सोमवारी माझी मुलगी त्याच्याकडे आली होती. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला असेल. तेव्हा सोरेनने तिला भेटायला बोलावले. त्यांच्याच वादविवाद होऊन तिने काहीतरी खाल्ले असावे. कदाचित तिला जबरदस्ती मारहाण करण्यात बोलावले आणि त्यांच्यात अनेकदा वादही झाला. तिला जबरजदस्ती मारहाण करण्यात आल्याचे तिच्या आईने संशय व्यक्त केला. याच संशयाच्या आधारे तरुणाला अटक करावी अशी पोलिसांकडे मागणी करण्यात आली.
हे ही वाचा : मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचं थैमान, तांत्रिक बिघाडामुळे मनोरेल बंद, 'एवढे' प्रवासी अडकले
दरम्यान, शुक्रवारी पीडितेच्या आईने सांगितलं की, सोरेनने शुक्रवारी तिला फोनद्वारे संपर्क करत मालाद येथे येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर माझ्या मुलीच्या तोंडातून फेस येत असल्याचे आढळून आले आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला, असे ती म्हणाली.
ADVERTISEMENT
