मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचं थैमान, तांत्रिक बिघाडामुळे मनोरेल बंद, 'एवढे' प्रवासी अडकले

Monorail News : मुंबईत पुन्हा मोनोरेल बंद पडल्याचं चित्र समोर आलं आहे. ही घटना वडाळा भागात 15 सप्टेंबर रोजी सकाळी घडली आहे. या घटनेनं मनोरेलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं.

monorail news

monorail news

मुंबई तक

• 11:27 AM • 15 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाचं थैमान

point

सकाळी मोनोरेल अडकली

point

नेमकं काय घडलं?

Mumbai Monorail : मुंबईत मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने थैमान घातलं आहे. पावसाचा तडाखा सुरू असताना मुंबईत पुन्हा मोनोरेल बंद पडल्याचं चित्र समोर आलं आहे. ही घटना वडाळा भागात 15 सप्टेंबर रोजी सकाळी घडली आहे. या घटनेनं मनोरेलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं. या घटनेनंतर बचावकार्याने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर कढले. नोकरदार वर्गाला या दुर्घटनेनं मोठा त्रास सहन करावा लागला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ऐकावं ते नवलंच! साताऱ्यात महिलेला सात बाळ, एकाच वेळी चार बाळांना दिला जन्म, डॉक्टरही चक्रावले

तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद

प्राथमिक माहितीनुसार, मोनोरेल ही चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचं सांगण्यात येत आहे. मोनोरेलचे ट्रॅक हे एखाद्या पुलाप्रमाणे उंचीवर असतात, अशा स्थितीत अकरा प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडल्याचं सांगण्यात येतंय. त्यांना खाली येणं शक्य होत नसल्याने बचावकार्य मदतीला आले. अशा स्थितीत या मुसळधार पावसाने मुंबईतील वाहतूक खोळंबलेली दिसून येत आहे. अंधेरी सबवेखाली पाणी साचलं आहे. लोकल काही मिनिटांते अंतर ठेववत धावत आहेत. 

नोकरदाराचे हाल, अडकलेल्यांना काढलं बाहेर

शहरातील वाढती बेसुमार लोकसंख्या लक्षात घेता वाहतूक सुविधांचं जाळं विनण्यात आलं. यात मोनोरेलचाही समावेश करण्यात आला. परंतु, या मोनोरेलच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल बंद पडली. नोकरीसाठी निघालेल्या लोकांचे हाल झाले. काही दिवसांपूर्वी देखील अशीच मनोरेल्वे बंद पडली होती. सध्याही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना मोनोरेलमध्ये श्वास घेण्याचा त्रास झाला होता. 

हे ही वाचा : 'या' तारखेला बुध ग्रहाचे संक्रमण होणार, काही राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

या मुसळधार पावसाने मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. नागरिकांनी अतितक्षता घेतच घराबाहेर पडाले असे स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. 

    follow whatsapp