मुंबईची खबर: वाहन चालकांनो! आता PUC नसेल तर मिळणार नाही ‘ही’ गोष्ट... मोठी घोषणा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 'नो पीयूसी-नो फ्युएल' हा नियम लागू केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

लवकरच 'नो पीयूसी-नो फ्यूएल' नियम सुरू होणार...

लवकरच 'नो पीयूसी-नो फ्यूएल' नियम सुरू होणार...

मुंबई तक

15 Sep 2025 (अपडेटेड: 15 Sep 2025, 09:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लवकरच 'नो पीयूसी-नो फ्यूएल' नियम सुरू होणार...

point

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा!

Mumbai News: देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 'नो पीयूसी-नो फ्युएल' हा नियम लागू केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यावर भर दिला आहे. येणाऱ्या पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीला काही पर्यावरणपूरक निर्बंध स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

वाहन क्रमांक स्कॅन केला जाईल...

यासंदर्भात माहिती देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, कॅमेऱ्यांच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक स्कॅन केला जाईल. याद्वारे त्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (पीयूसी) वैधता तपासली जाईल. जर त्या वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही. त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तात्काळ मिळवण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून चालकाला कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच, भविष्यात वाहन विक्री शोरूम आणि वाहन दुरुस्ती गॅरेजमध्येही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार! 'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...

परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. पीयूसी बेकायदेशीर आणि कालबाह्य असल्यास इंधन देऊ नये, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

हे ही वाचा: अंगावरचे कपडे फाडून पत्नीला अर्धनग्न केलं, नंतर भर रस्त्यात... 'त्या' शिक्षिकेसोबत पतीने नेमकं काय केलं?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल. यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. सध्या बेकायदेशीरपणे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन विभागाने कडक मोहीम राबवावी असं देखील आवाहन त्यांनी केलं. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या घोषणेनंतर, हा नियम काही काळातच लागू केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. 

    follow whatsapp