Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, 15 सप्टेंबर रोजी राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर विदर्भ आणि मराठवाडा भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गात 15 सप्टेंबर रोजी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका निर्माण होणार असून सावधानता बाळगावी, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : 'आरक्षण न मिळाल्यास पुढचा काळ लेकरांसाठी...' विष प्राशन करत आणखी एका मराठा बांधवाकडून टोकाचं पाऊल
विदर्भ :
विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही भागात हवामान विभागाने उष्ण आणि आर्द्र हवामानाच 14 ते 16 तारखेदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे.
ADVERTISEMENT
