कोरोना संकट असतानाही वर्षभर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात, ‘ही’ माहिती आली समोर

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात कृत्रिम ऑक्सिजनचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे. अनेक ठिकाणी तर ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागलेला आहे. पण याच दरम्यान, आता एक अशी माहिती समोर आली आहे की, 2020-21 या मागील आर्थिक वर्षात जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्यात केली आहे तेवढी याआधी कधीही करण्यात आली नव्हती. याबाबतचा डेटा हा वाणिज्य मंत्रालयाकडूनच समोर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:19 PM • 21 Apr 2021

follow google news

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात कृत्रिम ऑक्सिजनचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे. अनेक ठिकाणी तर ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागलेला आहे. पण याच दरम्यान, आता एक अशी माहिती समोर आली आहे की, 2020-21 या मागील आर्थिक वर्षात जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्यात केली आहे तेवढी याआधी कधीही करण्यात आली नव्हती. याबाबतचा डेटा हा वाणिज्य मंत्रालयाकडूनच समोर आला आहे. ही निर्यात तेव्हा झालीए की जेव्हा भारत हा कोरोना व्हायरसच्या बाबतीत जगातील तिसरा देश ठरला आहे.

हे वाचलं का?

एप्रिल 2020 ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यात भारताने जगभरात तब्बल 9,301 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली आहे. या व्यापारातून भारताने जवळजवळ 8.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 2019-20 या वित्तीय वर्षात भारताने 4,514 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली होती. ज्यातून भारताने 5.5 कोटी मिळवले होते.

कृत्रिम ऑक्सिजन हा कोरोना व्हायरसने गंभीररित्या आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाचा घटक आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणी देखील अधिक आहे. पण त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रासह अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी तर अवघे काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू

भारतातील एकूण रुग्ण संख्येपैकी एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ 60 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची अतिरिक्त मागणी केली होती. दरम्यान, 19 एप्रिलला देशातील अनेक राज्यात रेल्वेच्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या मदतीने ऑक्सिजन भरलेल्या क्रायोजेनिक टँकरमधून कृत्रिम ऑक्सिजन पाठविण्यात आला. जेणेकरुन ज्या-ज्या राज्यांना गरज आहे त्यांना-त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.

गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये जवळपास एकसारखेच रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे सरकार देखील याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

ऑक्सिजन विमानाने आणता येतो का? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

18 एप्रिलला केंद्र सरकारने एका आदेश जारी केला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, उद्योगांना पुरवला जाणारा ऑक्सिजन हा थेट रुग्णालयांना दिला जावा. याशिवाय फक्त काही अत्यंत आवश्यक असणाऱ्या उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा. याबाबतच्या शिफारसी या 22 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

Oxygen Plant: हवेतून दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती, महाराष्ट्रात कुठे सुरु होणार प्लांट?

दरम्यान, या आदेशात ED-II म्हटलं आहे की, मेडिकल ऑक्सिजनची मागणी पहिलेच उत्पादन क्षमतेच्या 60 टक्के आहे आणि येत्या काही दिवसात त्याची मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, सेल, टाटा स्टील, निप्पोन स्टिल, स्टिल इंडियासारख्या अनेक कंपन्यांनी याआधीच लोकांचा जीव वाचवला जावा या उद्देशाने आपल्या परिने शक्य तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. स्टील मंत्रालयानुसार, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील स्टील प्लांटमध्ये असणाऱ्या 28 ऑक्सिजन संयंत्राद्वारे जवळजवळ 1,500 टन वैद्यकीय वापराचा ऑक्सिजन तयार केला जात आहे. याशिवाय अतिरिक्त 30,000 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे.

    follow whatsapp