Personal Finance Tips for Buying Sliver: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किंमती गुरुवारी (18 सप्टेंबर) घसरल्या. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारातील कमकुवतपणाचे प्रतिबिंब देशांतर्गत बाजारावर पडले. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर ही घसरण झाली. फेडने पुढील व्याजदर कपातीबद्दल सावधगिरी व्यक्त केली आणि पुढील वर्षी अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या अटकळांना धूळ चारली.
ADVERTISEMENT
गेल्या वर्षभरात सोने आणि चांदी सुमारे 50% ने महाग झाली आहे आणि अलिकडेच, MCX वर चांदीने प्रति किलो ₹1,30,000 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, दीर्घकाळात चांदी प्रति किलो ₹1,50,000 पर्यंत पोहोचू शकते, जरी अल्पावधीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
चांदीच्या किंमतींबद्दल तज्ज्ञांचं मत काय?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फेडच्या सावध भूमिकेमुळे चांदीच्या किंमतीत घट झाली असली तरी, औद्योगिक मागणी (सौर, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स) आणि पुरवठ्यातील अडचणी दीर्घकाळात किमतींना आधार देत राहतील. त्यांचे म्हणणे आहे की, डिसेंबरपर्यंत चांदीचा भाव ₹1,18,000 ते 1, 20,000 प्रति किलोपर्यंत घसरू शकतो, परंतु वर्षाच्या अखेरीस तो ₹ 1,40,000 प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो.
सोने आणि चांदीने फेड दर कपात, टॅरिफ अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव यासारख्या सकारात्मक घटकांना आधीच दुर्लक्षित केले आहे. नजीकच्या काळात चांदीच्या किमती 10-12% ने कमी होऊ शकतात, परंतु दीर्घकालीन रचना मजबूत राहील. त्यामुळे असा अंदाज आहे की, 2026 पर्यंत MCX वर चांदी प्रति किलो ₹1,50,000 पर्यंत पोहोचू शकते.
दिवाळीत सोनं-चांदी स्वस्त होणार?
या दिवाळीत सोने आणि चांदीचे दर सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 5% कमी असू शकतात. सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,05,000 रुपये आणि चांदी प्रति किलो सुमारे 1,12,000 रुपये असू शकते. असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहे. मात्र, हा केवळ अंदाज आहे.
बाजारातील चढ-उतार, महागाई दर, वैश्विक आर्थिक वातावरण यासारख्या अनेक गोष्टी या सोने-चांदींच्या किंमतींवर परिणाम करतात. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी योग्य संधीची वाट पाहून नंतरच ते खरेदी करावं असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
