Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? उद्धव ठाकरेंचं भाकीत

मुंबई तक

• 10:54 AM • 05 Nov 2022

मुंबई : राज्यातील मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्तविलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती, याच बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच या संभाव्य […]

Mumbai Tak
Google CTA

मुंबई : राज्यातील मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्तविलं आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती, याच बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांनाही तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमदार मनिषा कायंदे आणि खासदार अरविंद सावंत यांनी माहिती दिली.

मनिषा कायंदे म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना मातोश्रीवरील पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ही पद्धत चालू आहे. त्यानुसार आज बैठक झाली.

गुजरातमधील निवडणूक जाहीर झाली आहे, त्यापूर्वी महाराष्ट्रातील चार प्रकल्प इथून गुजरातला पळवले. सोबतच पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी एक खास पॅकेज जाहीर केले, परंतु त्यात नवीन कोणतीही प्रकल्प नाहीत. रेल्वे आणि रस्त्यांचही नवं पॅकेज नाही. काहीतरी घोषणा करायची. यातून एक अर्थ असाही निघतो की यामुळे महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहेच. हेच भाकीत उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे.

अरविंद सावंत म्हणाले, २०१२ पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकत्र जाहीर केल्या जात होते.२०१४ नंतर मात्र हिमाचल प्रदेश आधी आणि गुजरात नंतर अशा निवडणुका जाहीर केल्या जात आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र सरकार अनेक घोषणा करते. तोच प्रकार त्यांनी आता केला. महाराष्ट्रातील प्रकल्प त्यांनी पळवले. म्हणजे हे अंतिम टप्प्यातील होते.

त्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रासाठी जाहीर केले. पण त्यात नवीन काहीच नाही. त्यातील अनेक यापूर्वीचेच आहेत. आता जाहीर केलेले अनेक प्रकल्प हवेतीलच आहेत, आणि असं जेव्हा ते जाहीर करतात तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार मध्यावधी निवडणुकीची तयारी असते. त्याबाबत शक्यता त्यांनी वर्तविली, असं अरविंद सावंत म्हणाले.