धांगडधिंगा करणाऱ्यांना शिक्षकाने विचारला जाब, आरोपींनी केला शेवट

मुंबई तक

• 06:34 PM • 08 Sep 2026

Crime News : उपद्रव माजवणाऱ्या डिलीव्हरी बॉय आणि ढाबा कर्मचाऱ्यांचा एका  निवृत्त शिक्षकाने विरोध केला. याच्याच बदल्यात संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना आहे. निवृत्त शिक्षकाला बेदम मारहाण करत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाला बेदम मारहाण

point

उपद्रव माजवणाऱ्यांना शिक्षकाने जाब विचारला

Crime News : उपद्रव माजवणाऱ्या डिलीव्हरी बॉय आणि ढाबा कर्मचाऱ्यांचा एका  निवृत्त शिक्षकाने विरोध केला. याच्याच बदल्यात संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना आहे. निवृत्त शिक्षकाला बेदम मारहाण करत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपींनी पीडिताला लाथा-बु्क्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या गंभीर प्रकरणात पीडित महिला जखमी झाली होती. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिला शिक्षिकेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आहे. हा प्रकार दिल्लीच्या मणिपुर पसिरातील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुण्यात पाणीपुरवठा खंडीत, 'या' विभागांवर होणार परिणाम

शिक्षकाला बेदम मारहाण

पोलिसांच्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी सनलाइट कॉलनी पोलीस ठाणे येथे पीसीएअर येथे एक कॉल आला होता. तो फोन किलोकारी गावातून आला होता, ज्यात तक्रारदारांनी सांगितलं की, किलोकारी गावातील रहिवासी असलेले सी. विक्रम सिंहला बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात सी. विक्रम हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर हे प्रकरण एएसआई वीरेंद्र सिंह यांच्याकडे सोपावण्यात आले होते. 

उपद्रव माजवणाऱ्यांना शिक्षकाने जाब विचारला अन्..

पोलिसांच्या माहितीनुसार, सी. विक्रम सिंह यांनी सांगितलं की, घराच्या समोर डिलिव्हरी बॉय आणि ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी उपद्रव माजवला होता. इतक्यातच सी. विक्रम सिंह खाली आले आणि त्यांनी लोकांना खडसावलं असता, काही लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर सी. विक्रम सिंह हे गंभीर जखमी झालेत. 

हे ही वाचा : सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक

नंतर चेंगथाम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. पकडण्यात आलेल्या काही आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासादरम्यान हत्येमागील खरं सत्य समोर येईलच.