लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न, पण चारच महिन्यात तलावात आढळले मृतदेह

मुंबई तक

• 12:17 PM • 08 Sep 2026

एका जोडप्यानं कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. लग्नाला चार महिने उलटून गेल्यानंतर एका तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले. केरळमधील ही घटना नेमकी काय आहे आणि त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न

point

पण चारच महिन्यात तलावात आढळले मृतदेह

Crime News : लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न पाहिलेल्या जोडप्याचा करुण अंत झाला आहे. एका तलावात रविवारी (6 सप्टेंबर) सकाळी एका नवविवाहित जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. राजीव (वय 26) आणि अभिरामी (वय 19) अशी या मृत दाम्पत्याची नावे आहेत. केरळच्या तिरुअनंतरपुरम परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

तलावात आढळले मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तलावात सुरुवातीला अभिरामीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर अभिरामीचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 50 मीटर अंतरावर राजीवचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. रविवारी पहाटेच्या सुमारास या जोडप्याने तलावात उडी मारून जीवन संपवले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार

कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न

राजीव आणि अभिरामी यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि दोन्ही कुटुंबांचा विरोध असतानाही त्यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. लग्नानंतर हे जोडपे एका भाड्याच्या घरात राहत होते. पोलीस आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर या दोघांनीही आपापल्या कुटुंबांशी कोणताही संपर्क ठेवला नव्हता. राजीव हा एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.

हे ही वाचा : सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम, खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली, काय घडलं?

आत्महत्या की हत्या?

गेल्या महिन्यात या जोडप्याला समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांचेही मृतदेह  तालुका रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते आणि शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.