UP Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात लग्नाला अवघे दोन महिने झाले असतानाच एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी पतीनेच पोलिसांना फोन करून पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मृत महिलेची ओळख सपना उर्फ आस्मा अशी झाली आहे. ती पती गजेंद्र सांखवार (30) याच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. गजेंद्र हा गवंडी म्हणून काम करतो.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाऊ आधीच अत्याचाराच्या प्रकरणात तुरुंगात, आता बहिणीने केलं मोठं कांड!
सपनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करुन हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सपना मोबाईल फोनवरून कोणाशी तरी बोलत होती. याच दरम्यान काही कारणावरून तिचा आणि गजेंद्रचा वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढला. त्यानंतर गजेंद्रने लोखंडी रॉड उचलून सपनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सपना गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. त्यानंतर गजेंद्रने स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती देत आपण पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.
हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, शेवटच्या श्रावणी सोमवारी कसं असेल वातावरण?
घरगुती वादातून घटना घडल्यांची पोलिसांची माहिती
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सपनाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गजेंद्रला ताब्यात घेतले असून या प्रकरणी त्याची चौकशी सुरू केली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक आलोक प्रसाद यांनी सांगितले की, या दाम्पत्याने जवळपास दोन महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. लग्नाला दोन महिने पूर्ण होण्याआधीच सपनाची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणात पंचनामा अहवाल तयार केला असून मृतदेहाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गजेंद्रला ताब्यात घेऊन पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. पतीनेच पोलिसांना हत्येची माहिती दिल्याने या प्रकरणाचा तपास त्याच्या चौकशीच्या आधारे पुढे नेला जात आहे.
ADVERTISEMENT












