Crime News : एका तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रेम, लग्नाचे आश्वासन, लिंग बदल आणि कथित फसवणुकीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. तक्रारदाराने त्रिवेंद्र नावाच्या तरुणावर सुमारे दोन वर्षे प्रेमसंबंध ठेवणे, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि आर्थिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्रिवेंद्र सिंग, त्याचे वडील अंतर सिंग आणि पत्नी किरण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हॉटेल्समध्ये शारीरिक संबंध
तक्रारदाराच्या दाव्यानुसार, दोन वर्षांपूर्वी त्याची त्रिवेंद्र सिंगसोबत भेट झाली होती, ज्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि त्रिवेंद्रने त्याला पत्नी म्हणून सोबत ठेवण्याचे तसेच लग्न करण्याचे आश्वासन दिले. या विश्वासाच्या आधारावर आरोपी त्याला विविध हॉटेल्समध्ये घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवत असे. मात्र, जेव्हा तक्रारदाराने लग्नासाठी तगादा मागे लावला, तेव्हा आरोपी आपल्या वचनापासून मागे हटत असल्याचे दिसून आले.
हे ही वाचा : भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
लिंगबदल करुनही लग्नास नकार
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बाब म्हणजे लिंग बदलाचा आरोप आहे. तक्रारदाराचा दावा आहे की, 8 ऑगस्ट 2025 रोजी त्रिवेंद्र त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता आणि जोपर्यंत तो पुरुष ट्रान्सजेंडरमधून स्त्री ट्रान्सजेंडर बनत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी अट घातली. आरोपीच्या या सांगण्यावरून तक्रारदाराने ऑपरेशन करून आपले लिंग बदलवून घेतले, ज्यामध्ये त्याला मोठी शारीरिक व आर्थिक झळ सोसावी लागली. या सर्व प्रक्रियेनंतरही त्रिवेंद्रने लग्न करण्यास नकार दिला.
हे ही वाचा : संतोष पंडितांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं की अडकले? पडद्यामागची इनसाईड स्टोरी...
आर्थिक शोषणही केले
तपासात पुढे असेही समोर आले की, आरोपी त्रिवेंद्र आधीपासूनच विवाहित असून त्याने ही बाब लपवून ठेवली होती. तसेच व्यवसायाचे व इतर कारणांचे कारण सांगून आरोपीने तक्रारदाराकडून सुमारे चार लाख रुपये रोख आणि एक बुलेट मोटरसायकल घेतली होती. पैशांची मागणी केल्यावर आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सिकंदरा पोलिसांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा नोंदवला असून, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












