भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
रक्षाबंधनादिवशी भावाविषयी वाईट बोलल्यानंतर झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाले. नणंद आणि भावजयी यांच्यातील या एकीचा चाकूने वार करून तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात
इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं
नेमकं काय घडलं?
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या सणादिवशी एका 21 वर्षीय नवविवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदना असं मृत महिलेचं नाव आहे. वंदनाचा मृतदेह एका बंद घराबाहेरील पाण्याच्या हौदात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मध्य प्रदेशातील इंदोरमधील राऊ परिसरातील न्यू नेहरू नगरमधील ही घटना आहे.
चाकूने वार करुन हत्या
या प्रकरणात मृत वंदना आणि तिची नणंद पार्वती यांच्यात पार्वतीच्या भावावरून वाद झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पार्वतीचा भाऊ तुरुंगात बलात्काराच्या गुन्ह्यात बंद असून, रक्षाबंधनादिवशी वंदनाने त्याच्यावर काही टिप्पणी केल्यामुळे दोघींमध्ये बाचाबाची झाली. हा किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या पार्वतीने घरातील चाकूने वंदनावर वार करून तिची हत्या केली.
हे ही वाचा : Vidyanand Bapat Interview : मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?
निर्दोष भासवण्याचा प्रयत्न
गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने वंदनाचा मृतदेह ओढत नेऊन पाण्याच्या हौदात फेकून दिला आणि स्वतःला पूर्णपणे निर्दोष भासवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या पतीला भेटायलाही गेली. दरम्यान, वंदनाच्या गायब होण्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून तपास सुरू केला.
हे ही वाचा : पुणे मेट्रो : विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर
असं बाहेर आलं प्रकरण
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यामुळे आरोपी पार्वतीचे बिंग फुटले व तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू जप्त करून आरोपी जेठानीला बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या एक महिन्यापूर्वीच प्रेमात पडून विवाह केलेल्या नवविवाहितेचा अशा प्रकारे अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
