पुणे मेट्रो : विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर
माध्यमांसोबत बोलत असताना गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्याने विद्यानंद बापटांना मारहाण केली. या घटनेनंतर आता बापटांच्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद गर्दभरोहणम्
विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर
FIR By Vidyanand Bapat : पुण्यातील टिळक रस्त्यावर विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाविषयी मुलाखत सुरू असताना, महेश नागरी सहकारी बँकेसमोर गुलाबी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने बापट यांना अडवले. "तुम्ही गणेशोत्सवात अडथळा निर्माण करता आणि डीजेच्या विरोधात बोलता," असे म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कोणत्या कलमांन्वये गुन्हा दाखल?
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीरपणे रस्ता अडवणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन व शिवीगाळ करणे, स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे आणि जीवे मारण्याची वा हानी पोहोचवण्याची धमकी देणे (क्रिमिनल इंटिमेटेशन) यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. या कायदेशीर कलमांमुळे येत्या काळात न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी कशी होईल, हे स्पष्ट होते.
हे ही वाचा : संतोष पंडितांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं की अडकले? पडद्यामागची इनसाईड स्टोरी...
पोलिसांनी बापटांना काय सांगितलं?
घटना घडल्यानंतर बापट यांना पोलिसांनी घरी सोडले आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना घराबाहेर न पडण्याचा व सार्वजनिक ठिकाणी मुलाखती न देण्याचा सल्ला दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून, विरोधकांसह मुख्यमंत्री पातळीवरूनही घडलेल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची भूमिका आणि कारवाईबाबत अद्यापही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: घरात 'एवढे' पैसे रोख ठेवले तर वर्षभरात किती नुकसान? जाणून घ्या पैशांचा खरा हिशोब
कायदेशीर लढा देण्याची भूमिका
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांपेक्षा बापट यांनी पोलिसांसमोर दिलेले अधिकृत स्टेटमेंट आणि फिर्याद हीच आगामी खटल्याचा मुख्य पाया असणार आहे. संविधानात्मक मार्गाने तक्रार दाखल करत बापट यांनी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली असून, आता या प्रकरणात आरोपीवर न्यायालयीन प्रक्रिया कशी पुढे चालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
