Navi Mumbai Crime : निलेश पाटील - नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना आहे. आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याची ASI पी. एओन. पाटील अशी ओळख समोर आली. दहिहंडी सुरू असताना रात्रीच्या सुमारास आठ पानांची सुसाईड नोट लिहून व्हिडिओ बनवून जीवन संपवलं. ही घटना नवी मुंबईतील रबाळे परिसरातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पैसे न दिल्याने महिलेला ठेवले ओलीस, नग्न करून व्हिडिओ केले रेकॉर्ड
पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या करून लिहिली सुसाईड नोट
घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. ज्यात डीसीपी संजय कुमार पाटील, वायरलेस ACP गिरीश ठाकरे आणि एस्टैब्लिशमेंट डिपार्टमेंटचे मुख्य जयवंत अहिरे यांची नावे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मात्र, पोलिसांनी त्या पत्रातील मजकूर पूर्णपणे उघड करण्यास नकार देण्यात आल्या. हे प्रकरण वेगळ्याच दिशेने वळण घेत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पीएन पाटीलचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नवी मुंबईच्या रबाळे परिसरातील काही रहिवाशांनी रबाळे औद्योगिक वसाहतीत आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी रस्ता रोको आंदोनल देखील केले होते. शिवसेना नेते देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. दरम्यान, आयएसआय पी.एन पाटील यांच्या सुसाईड प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी रस्ता अडवला होता.
हे ही वाचा : विद्यार्थ्याच्या बापाचे शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
सुसाईड नोटमध्ये नेमकी कोणाची नावे?
सुसाईड नोटमध्ये DCP संजय कुमार पाटिल, वायरलेस ACP गिरीश ठाकरे और एस्टैब्लिशमेंट डिपार्टमेंटचे मुख्य कांस्टेबल जयवंत अहिरे यांचे देखील नाव समोर आले आहे. मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.
ADVERTISEMENT












