विद्यार्थ्याच्या बापाचे शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

मुंबई तक

Crime News : विद्यार्थ्याच्या वडिलांवर एका शिक्षिकेनं गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी एका शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ बनवून सतत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिला शिक्षिकेनं पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षिका विद्यार्थ्याचा अभ्यास घेण्यासाठी घरी जायची

point

विद्यार्थ्याचा बाप शिक्षिकेशी करायचा अश्लील कृत्य 

Crime News : विद्यार्थ्याच्या वडिलांवर एका शिक्षिकेनं गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी एका शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ बनवून सतत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिला शिक्षिकेनं पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिहारच्या दरभंगा येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : पैसे न दिल्याने महिलेला ठेवले ओलीस, नग्न करून व्हिडिओ केले रेकॉर्ड

शिक्षिका मुलाचा अभ्यास घेण्यासाठी घरी जायची

शिक्षिकेच्या आरोपानुसार, आरोपीची ओळख चांद महतो अशी आहे. त्याच चांद महतोने शिक्षिकेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. महिला पीडित शिक्षिका ही त्याच्याच घरी मुलाचा अभ्यास घेण्यासाठी घरी जायची, मात्र याचाच गैरफायदा घेत शिक्षिकेसोबत महतोने अश्लील कृत्य केले. महिला पीडित शिक्षिकेनं आरोप केला की, चांद महतोने शौचालयासह सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यानंतर तो ब्लॅकमेल करू लागला होता. 

विद्यार्थ्याचा बाप शिक्षिकेशी करायचा अश्लील कृत्य 

महिला शिक्षिकेनं आरोप केला की, अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर चांदने धमकावून पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर त्रासाला कंटाळून महिलेनं पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली, तसेच गुन्हा नोंदवला. या प्रकरणात वैद्यकीय तपासणी सुरू ठेवली जात आहे. 

हे ही वाचा : बीड : आई-वडील नसताना घरात शिरला नराधम अन् घडलं भयानक, विद्यार्थिनीनं काय सांगितलं?

दरम्यान, महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना देशभर सुरू आहेत. या सासत्याने घडल्या जाणाऱ्या घटनेनं महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.