पैसे न दिल्याने महिलेला ठेवले ओलीस, नग्न करून व्हिडिओ केले रेकॉर्ड
Crime News : एका महिलेसोबत लज्जास्पद प्रकार घडल्याचे वृत्त आहे. लोनचे पैसे आणि व्याज न भरल्याने एका महिलेला कथितरित्या महिलेचे अपहरण करत तिला विवस्त्र केले आणि तिला बेदम मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेनं 1 लाख रुपयांचं घेतलं लोन
पैसे परत न केल्यास महिलेला विवस्त्र करून व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
Crime News : कर्ज वसुलीच्या प्रकरणातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी कंपनीत एका अॅपच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कर्जदारांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र आता याच मुद्द्यावरून एका महिलेसोबत लज्जास्पद प्रकार घडल्याचे वृत्त आहे. लोनचे पैसे आणि व्याज न भरल्याने एका महिलेला कथितरित्या महिलेचे अपहरण करत तिला विवस्त्र केले आणि तिला बेदम मारहाण केली होती. ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथील आहे.
हे ही वाचा : बीड : आई-वडील नसताना घरात शिरला नराधम अन् घडलं भयानक, विद्यार्थिनीनं काय सांगितलं?
पैसे परत न केल्यास महिलेला विवस्त्र करून व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, या प्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश होता. आरोपींनी महिलेला विवस्त्र करत तिचे काही व्हिडिओ बनवले आणि जर पैसे दिले नाही,तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेची आई आपली मुलगी बेपत्ता असल्याची तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनुसार, महिलेनं दोन वर्षांपूर्वी रेशमा बानू नावाच्या महिलेकडून 1 लाख रुपये घेतले होते. यानंतर तिने रेशमाच्या माध्यमातून आरोपी नाजतकडून 50 हजार रुपये घेतले होते.
आर्थिक स्थितीमुळे महिलेनं हप्ते देणे केलं बंद
पोलिसांनुसार, आर्थिक समस्यामुळे महिलेनं सहा महिन्यांपासून व्याज आणि दोन महिन्यांपासून हप्ते देणे बंद केलं. नंतर तिने रेशमाचा नंबर ब्लॉक केला आणि ती तिच्या माहेरी गेली होती. पोलिसांनी घटनेची माहिती देत सांगितलं की, नजातने नोकरीच्या बहाण्याने त्या महिलेला कथितरित्या घरी बोलावले. तिथे रेशमा आणि पती सुहेल तिथेच होते. संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, त्या तिघांनी मिळून महिलेला मारहाण केली.
हे ही वाचा : भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला. नंतर तिला जबरदस्ती ऑटो रिक्षात बसवण्यात आले आणि अपहरण केले. तिला कुंबलगोडूजवळ एका घरात नेण्यात आले, जिथे तिला कथितरित्या ओलीस ठेवण्यात आले होते. नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. नंतर रेशमा बानू, नजात आणि सुहेल यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू ठेवला.
