जन्मष्टमीच्या रात्री मंदिरात गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार 

मुंबई तक

06 Sep 2026 (अपडेटेड: 06 Sep 2026, 03:04 PM)

Crime News : कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री मंदिरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रकरण चिघळलं.

crime news (AI Photo)

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जन्मष्टमीच्या रात्री मंदिरात गेलेल्या 14 वर्षीय पीडितेवर अत्याचार 

point

ग्रामस्थांच्या शोधानंतर पीडिता आरोपीच्या घरात अस्वस्थ आढळली 

Crime News : कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री मंदिरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रकरण आणखी चिघळून निघालं. पीडितेनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर आरोपीच्या मुसक्या देखील आवळण्यात आल्यात. दरम्यान, आरोपीची समीर अशी ओळख समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथील जनपदची घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पैसे न दिल्याने महिलेला ठेवले ओलीस, नग्न करून व्हिडिओ केले रेकॉर्ड

जन्मष्टमीच्या रात्री मंदिरात गेलेल्या 14 वर्षीय पीडितेवर अत्याचार 

लैंगिक शोषण केलेल्या पीडितेचं वय 14 वर्षे आहे. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, ती जन्मष्टमीच्या रात्री मंदिरात गेली होती. याचदरम्यान, गावातील मोहम्मद समीर नावाचा तरुण हा दोन साथीदारांसोबत मिळून रस्त्यावरून उचलून घेऊन गेला होता. त्या साथीदारांची वलीन आणि सलमान अशी ओलख समोर आली. 

ग्रामस्थांच्या शोधानंतर पीडिता आरोपीच्या घरात अस्वस्थ आढळली

आरोपी तरुण समीरने आपल्या घरातील एका खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी ही तासन् तास बेपत्ता झाली होती. जेव्हा ग्रामस्थांनी तिचा शोध घेणे सुरूच ठेवले असता, पीडित मुलगी ही समीरच्या घरी अत्यंत अस्वस्थ स्थितीत आढळून आली होती. त्याचदरम्यान तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. 

एनडीटीव्ही माहितीनुसार, योग प्रकरणात साधना आश्रमाचे पुजारी स्वामी यशवीर महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकारला आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्याची विनंती केली होती. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर दोघांचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : विद्यार्थ्याच्या बापाचे शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आलीत, नंतर आरोपीला अटक केली. दरम्यान, इतर दोघांविरुद्ध पुरावे गोळा केले जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.