Beed Crime, रोहिदास हातागळे : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची आणि तिचे अश्लील व्हिडिओ काढल्याची अत्यंत संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणी मुख्य आरोपी शेख मुस्सवीर शेख वसीम याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
शारीरिक संबंधांसाठी दबाव
पीडित तरुणी नीटच्या कोचिंग क्लासमध्ये असताना आरोपीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर तिने बीएचएमएस अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, तरीही आरोपी तिचा सातत्याने पाठलाग करत होता आणि शारीरिक संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकत राहिला. तरुणीने त्याचे सर्व प्रयत्न आणि मागण्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या, ज्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला.
हे ही वाचा : पडळकरांना मराठा आंदोलकांनी रोखलं, घोषणा होताच गाडी थांबवली, गोंधळ!
बेशुद्ध करुन केले अत्याचार
आई-वडील घरी नसलेल्या संधीचा फायदा घेऊन आरोपीने तरुणीला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळून दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिने नको असतानाही तिचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर याच व्हिडिओंच्या जोरावर आरोपीने तिला वारंवार ब्लॅकमेल केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरी केली.
हे ही वाचा : भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
अखेर आई-वडिलांना सांगितला घडलेला प्रकार
4 सप्टेंबर रोजी आरोपीने तिला पुन्हा एकदा चित्रपट पाहण्यासाठी येण्याची धमकी दिली आणि नकार दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवली. या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्यानंतर तिने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
ADVERTISEMENT












