पडळकरांना मराठा आंदोलकांनी रोखलं, घोषणा होताच गाडी थांबवली, गोंधळ!

मुंबई तक

सोलापूर जिल्ह्यातील कामती येथे मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारला. मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

ADVERTISEMENT

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पडळकरांना मराठा आंदोलकांनी रोखलं

point

घोषणा होताच गाडी थांबवली

point

गोंधळ!

Gopichand Padalkar : सोलापूर जिल्ह्यातील कामती येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारला. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करत, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आग्रही विनंती केली, ज्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरक्षणाला आमचा सातत्याने पाठिंबा

आंदोलकांशी संवाद साधताना आमदार पडळकर यांनी सोलापूर ते मिरज राष्ट्रीय महामार्गावर योगयोगाने आपलीच गाडी पहिल्यांदा अडवण्यात आल्याचे नमूद करत मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाला एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणाला आमचा सातत्याने पाठिंबा राहिला आहे आणि या भूमिकेत कसलेही बदल झालेले नाहीत.

हे ही वाचा : ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या मंत्र्यांनाच जरांगेंनी फैलावर का घेतलं?

चुकीच्या पद्धतींवर आक्षेप

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी म्हणून मूळ नोंदी आहेत, त्या सर्व पात्र बांधवांना कायदेशीर दाखले मिळण्याबाबत आपला किंवा कोणाचाही कधीही विरोध नव्हता आणि आजही नाही, असे सांगत पडळकर यांनी या मुद्द्यावर सर्वांचीच भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. मात्र, नोंदींमध्ये कोणतीही खडाखोड करणे, मागे-पुढे ओव्हररायटिंग करणे किंवा चुकीच्या पद्धतीने दाखले काढणे या प्रकारांवर त्यांचा आक्षेप असून, यामुळे संपूर्ण समाजाची बदनामी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : Vidyanand Bapat Interview : मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?

भावनांचा पूर्णपणे आदर

शेवटी, मराठा समाजाच्या भावनांचा आपण पूर्णपणे आदर करत असून या भावनांच्या सोबतच आमची भूमिका आहे, त्यामुळे यात कोणाच्याही मनात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलकांना दिली.