Govt Jobs : इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याची संधी सोडू नका, लगेच करा अर्ज

मुंबई तक

इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याची संधी चालून आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

ISRO Recruitment
ISRO Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याची संधी सोडू नका

point

लगेच करा अर्ज

ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सायंटिस्ट/इंजिनिअर पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. याद्वारे देशभरात एकूण 175 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या प्रमुख अभियांत्रिकी शाखांमधील रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामध्ये इस्रोनंतर 'PRL' (फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी) मधील काही पदांचाही समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेत किमान 65 टक्के गुणांसह बी.ई. किंवा बी.टेक (B.E/B.Tech) ची पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 16 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक असून, नियमांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : Vidyanand Bapat Interview : मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची भूमिका काय?

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी 750 रुपये शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रक्रिया शुल्क परताव्याची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांना संपूर्ण 750 रुपये परत केले जाणार आहेत.

हे ही वाचा : पुणे मेट्रो : विद्यानंद बापटांनी दिलेली FIR पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर

अंतिम मुदत

या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज (www.isro.gov.in) सादर करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार असून, देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.