'तुला शासकीय रुग्णालयात नोकरी लावतो...' महिलेवर बलात्कार केला अन्...
शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेला नोकरीचे आमिष दाखवले. तिच्यावर वारंवार लैंगित अत्याचार केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने नेमकं काय केलं, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुला शासकीय रुग्णालयात नोकरी लावतो
महिलेवर बलात्कार केला अन्...
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी एका शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला आणि आरोपी आधीपासूनच एकमेकांच्या परिचयाचे होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील इंदोरमधील ही घटना असून देवेंद्र वर्मा असे आरोपीचे नाव आहे.
नोकरीचे आमिष अन् लैंगिक अत्याचार
आरोपीची आणि पीडित महिलेची आधीपासूनच ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने पीडितेला चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवले आणि तिला जाळ्यात ओढले. आपल्यासोबत पुढं काय होणार आहे याची पुसटशी कल्पनाही पीडितेला नव्हती. यानंतर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात, इकडे बाहेर बहिणीने महिलेला संपवलं; नेमकं काय घडलं?
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच...
पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण तर होत होतेच, सोबतच तिला दाखवण्यात आलेले नोकरीचे आमिषही फसवे असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे तुकोगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : Personal Finance: घरात 'एवढे' पैसे रोख ठेवले तर वर्षभरात किती नुकसान? जाणून घ्या पैशांचा खरा हिशोब
धाड टाकून आरोपीला अटक
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. देवेंद्र वर्मा या नराधम आरोपीला धाड टाकून पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
