कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं

मुंबई तक

06 Sep 2026 (अपडेटेड: 06 Sep 2026, 06:29 PM)

Karad Crime News : कराडमध्ये मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून मुलाने मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. रविवारी मध्यरात्री लाहोटीनगर येथील सर्व्हिस रोडवर ही दुर्दैवी घटना घडली.

Karad Crime News

Karad Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध

point

साथीदाराच्या मदतीने आईच्या बॉयफ्रेंडला संपवलं

Karad Crime News : सकलेन मुलाणी - कराडमध्ये मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून मुलाने मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. रविवारी मध्यरात्री लाहोटीनगर येथील सर्व्हिस रोडवर ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुनील नाथा चव्हाण अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख समोर आली. तर सूरज दीपक चव्हाण आणि मित्र अक्षय सुरेश म्हात्रे अशी आरोपींची ओळख समोर आलेली आहे. या दोघांनाही सातारा येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्याने संपवलं जीवन, सुसाईड नोेटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे

दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज चव्हाणच्या आईसोबत मित्र सुनिल चव्हाण याचे गेली दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही चाफळ गावातील रहिवासी होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबातील सदस्यांना समजताच महिलेला दुसऱ्या गावात ठेवण्यात आले होते. मात्र, सुनिल चव्हाणला महिला सतत फोन करायची अशी माहिती समोर आली. 

साथीदाराच्या मदतीने आईच्या बॉयफ्रेंडला संपवलं

सूरजच्या मनात आपल्या आईच्या प्रेमसंबंधाबाबतचा राग मनात होता. याच रागातून त्याने मित्र अक्षय म्हेत्रेच्या मदतीने सुनिल चव्हाणला संपवण्याचा प्लान रचला होता. सुनिल हा कराडच्या पिज्जा हटमध्ये काम करत होता याची माहिती समोर आली होती. हेच लक्षात घेत सूरज चव्हाण आणि अक्षय म्हेत्रे दोघेही कराडमध्ये आले होते. सुनिल कामावरून सुटल्यानंतर दोघांनीही त्याला लाहोटीनगर येथील सर्व्हिसरोडवर अडवले होते. त्याचदरम्यान आरोपींनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करत सुनिल चव्हाणची हत्या केली. 

हे ही वाचा : विद्यार्थ्याच्या बापाचे शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

या हत्येनंतर सूरज आणि अक्षयने चारचाकी गाडीतून घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, पोलिसांनी सातारा येथून आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयितांकडून हल्ल्यात वापरलेले धारदार शस्त्र कोयता ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.