Crime News : दारूच्या नशेत एकाने अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीचा खून केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्याची घटना आहे. या घटनेनंतर नऊ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ही घटना बिहारच्या जमुई येथे 28 ऑगस्ट रोजी घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवऱ्याने बायकोचे केले तुकडे, नंतर फ्रीजमध्ये लपवून ठेवलं डोकं; दार उघडताच भयंकर
नेमकं काय घडलं?
चिमुरडी ही सायंकाळी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हा तिच्यासोबत असं काही होईल हे तिला आणि तिच्या कुटुंबियांना वाटलं नाही. ती बराच वेळ झाल्यानंतरही परतली नाही. संबंधित प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला होता. त्यांनी आजूबाजूचा परिसर आणि ओळखीच्या घरी तिचा शोध सुरू केला.
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट रोजी नीमरंग परिसरात एक अर्धवट बांधलेल्या घराच्या हद्दीजवळ मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणात जमुईचे प्रभारी एसडीपीओ आणि सायबर डीसीपी, अभिषेक कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली होती. काही दिवसांचा तपास केल्यानंतर त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवव्या दिवशी आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश
अटकेत आलेल्यांची ओळख मोहम्मद सरफरा आणि तनवीर अशी समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान, या हत्या प्रकरणात जुमई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या घटनेच्या दिवसांपासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी छापे देखील टाकण्यात आले होते, तसेच नवव्या दिवशी पोलिसांना आरोपीला पकडण्यास यश आले.
हे ही वाचा : नवरा अजारी असल्याचे कारण सांगितलं, बंगल्यावर नेत केले लैंगिक अत्याचार
सूत्रांच्या आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, रहिवाशांना इतर तथ्ये देखील उघड केली नाहीत. आरोपी सरफराज हा घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी कोलकात्याला निघून गेला होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने आपले केस आणि मिशा देखील कापल्या होत्या. दरम्यान, असा दावा करण्यात आलाय की, हातावरील नखांचे ठसे लपवण्यासाठी तिने सिगारेटने आपल्या हाताला चटके दिल्याचा प्रयत्न केला. या दाव्यांना पोलिसांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणी आरोपींना लवकर अटक करून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.
ADVERTISEMENT












