नवरा अजारी असल्याचे कारण सांगितलं, बंगल्यावर नेत केले लैंगिक अत्याचार
Crime News : नवरा आजारी असल्याचे सांगत दोन तरुणांनी महिलेला बोलावले एका निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं कालिंगानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा अजारी असल्याचं बायकोला सांगितलं कारण
आरोपींनी महिलेला बंगल्यावर नेत केले अत्याचार
Crime News : नवरा आजारी असल्याचे सांगत दोन तरुणांनी महिलेला बोलावले एका निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं कालिंगानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यान शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. ही घटना ओडिशाच्या जाजपुर येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Astrology : कन्या राशीत बुध ग्रह सक्रीय, 26 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींची होणार चांदी
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींपैकी एक आरोपी हा पीडित महिलेच्या ओळखीचा होता. त्यानेच फोन करून महिलेला सांगितलं की, तुझा पती आजारी आहे. नवऱ्याच्या आजारपणाबाबत ऐकताच पत्नी सायंकाळी 7 वाजता चंडीखोल येथे पोहोचली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेला कथितरित्या एका निर्जन कोणीही नसलेल्या बंगल्यात नेले होते. काहीच वेळांत तिथे आणखी एक तरुण आला होता. दोघेही आरोपी हे दारूच्या नशेत होते. सायंकाळीच महिलेवर दोघांनी कथितरित्या सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आरोपींचा गुन्ह्याचा कबुलीनामा
दरम्यान, महिलेवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आरोपींनी आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना एका स्थानिक न्यायालयात हजर केले होते. तिथे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
हे ही वाचा : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह; आता पतीने केली पत्नीची हत्या, पोलिसांना स्वतः दिली माहिती
नागपूर येथे पीडितेवर लैंगिक अत्याचार
दरम्यान, यापूर्वी देखील राज्याच्या नागपूर येथे लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि तिला धमकावून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे.
