अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह; आता पतीने केली पत्नीची हत्या, पोलिसांना स्वतः दिली माहिती

मुंबई तक

UP Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांत पतीने पत्नीची हत्या केली. लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केल्यानंतर आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह

point

आता पतीने केली पत्नीची हत्या

point

पोलिसांना स्वतः दिली माहिती

UP Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात लग्नाला अवघे दोन महिने झाले असतानाच एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी पतीनेच पोलिसांना फोन करून पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मृत महिलेची ओळख सपना उर्फ आस्मा अशी झाली आहे. ती पती गजेंद्र सांखवार (30) याच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होती. गजेंद्र हा गवंडी म्हणून काम करतो.

हेही वाचा : भाऊ आधीच अत्याचाराच्या प्रकरणात तुरुंगात, आता बहिणीने केलं मोठं कांड!

सपनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करुन हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सपना मोबाईल फोनवरून कोणाशी तरी बोलत होती. याच दरम्यान काही कारणावरून तिचा आणि गजेंद्रचा वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढला. त्यानंतर गजेंद्रने लोखंडी रॉड उचलून सपनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सपना गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. त्यानंतर गजेंद्रने स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती देत आपण पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, शेवटच्या श्रावणी सोमवारी कसं असेल वातावरण?