लाईट गेली अन् 55 वर्षीय नराधमाने साधला डाव, अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

मुंबई तक

एक महिला आपल्या चिमुकलीसह शेजाऱ्याकडे गेली. मात्र तिथे गेली असता अचानक लाईट गेली अन् भयानक प्रकार घडला. बिहारच्या गोपालगंजमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

लाईट गेली अन् 55 वर्षीय नराधमाने साधला डाव

point

अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका गावात सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी 55 वर्षांच्या एका प्रौढ शेजाऱ्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या गोपालगंज परिसरातील ही घटना आहे. 

लाईट गेली अन् घडलं भयानक

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (5 सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी तिच्या आईसोबत शेजाऱ्याच्या घरी गेली होती. रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान अचानक लाईट गेल्यामुळे संपूर्ण घरात अंधार झाला. याच अंधाराचा गैरफायदा घेत शेजाऱ्याने चिमुकलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात येताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर तिने त्वरित पोलीस स्टेशन गाठले.

हे ही वाचा : 'आजी, ते काका वाईट आहेत...' पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, कसं बाहेर आलं प्रकरण?

वैद्यकीय अहवालात अत्याचाराची पुष्टी

घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांनी मुलीसह पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तत्काळ गुन्हा दाखल करत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. वैद्यकीय तपासणी अहवालात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

हे ही वाचा : बस ड्रायव्हरनं नर्सरीच्या मुलीला चॉकलेट देत केलं लैंगिक शोषण, गुप्तांगावरील जखम पाहिली अन्..

आरोपी फरार

याबाबत पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, पीडित पक्षाच्या तक्रारीवरून पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार आरोपीच्या अटकेसाठी त्याच्या संभाव्य ठिकाणांवर पोलिसांकडून छापेमारी सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.