Astrology : कन्या राशीत बुध ग्रह सक्रीय, 26 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींची होणार चांदी
Astrology : द्रिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर 2026 रोजी बुध ग्रह हा आपल्या स्वत:च्या उच्च कन्या राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धि, व्यापार, तर्कशास्त्र, गणित आणि वाणीचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा आपल्या उच्च राशीत येतात. तो भाद्र राजयोगाची निर्मिती करतो, ज्यामुळे काही राशींचे करियर, धन आणि बैद्धिक क्षमतेनुसार क्षेत्रात विशेष लाभ मिळतो. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 : 40 वाजेपर्यंत राहणाऱ्या गोचरामुळे काही राशींना चांगला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.
ADVERTISEMENT

1/6
द्रिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर 2026 रोजी बुध ग्रह हा आपल्या स्वत:च्या उच्च कन्या राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धि, व्यापार, तर्कशास्त्र, गणित आणि वाणीचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा आपल्या उच्च राशीत येतात. तो भाद्र राजयोगाची निर्मिती करतो, ज्यामुळे काही राशींचे करियर, धन आणि बैद्धिक क्षमतेनुसार क्षेत्रात विशेष लाभ मिळतो. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 : 40 वाजेपर्यंत राहणाऱ्या गोचरामुळे काही राशींना चांगला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.

2/6
मेष
मेष राशीतील लोक करियरमध्ये यशस्वी होतील, नोकरदारांना लवकरच नोकरी मिळण्याचे योग बनून आलेत.

3/6
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. आपल्या राशीच्या पाचव्या भावात गोचरची निर्मिती होण्याची शक्यता आहे. अशातच धनाचा लाभ मिळणार असल्याची शक्यता आहे. करियर आणि व्यापारात सरकारी कार्यात सहयोग मिळणार आहे.

4/6
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांची सुख साधनांमध्ये वृद्धी होणार आहे. भौतिक सोयी सुविधा आणि संपत्तीच्या प्रकरणात नाव लौकिक मिळवाल.

5/6
कन्या
कन्या राशीतील लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल. करियर क्षेत्रात मान सन्मान मिळण्याचा योग निर्माण होणार आहे. आर्थिक फायदा मिळण्याचा योग आहे.

6/6
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या करियरमध्ये रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. पार्टनरशिप आणि इतर कामांमध्ये मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच चांगली डील होण्याची संभावना आहे.
