Crime News : श्रद्धा वालकरप्रमाणेच मन सुन्न करून टाकणारा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्याने आपल्या बायकोचा खून करत तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते. या घटनेची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली. आरोपी स्वत: सरेंडर झाल्याचे वृत्त आहे. आरोपीची रामानुज गोस्वामी (वय 30) अशी ओळख समोर आली होती. रामानुजने पत्नी रिया तालुकादारची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. ही घटना आसामच्या गुवाहाटी येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवरा अजारी असल्याचे कारण सांगितलं, बंगल्यावर नेत केले लैंगिक अत्याचार
फ्लॅटमधून येत होती दुर्गंधी
हत्या करणारा नवरा रामानुज आणि पत्नीचे काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. गावाहाटीच्या हाटीगाव पोलीस ठाणे परिसरात एका अपार्टमेंटमध्ये दोघेही राहत होते. तेव्हा स्थानिकांनी हटीगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली की, त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत आहे. तेथील स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघेही दोन दिवसांपासून दिसत नाहीत, त्यांचे फोन देखील बंद असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
बायकोची हत्या करून डोके फ्रीजमध्ये लपवले
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती मिळवली. त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता, महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते, तसेच मृतदेहाचे डोकंच गायब होते. पोलिसांनी घराचा तपास केला असता, डोकं फ्रीजमध्ये आढळले. नंतर पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे सोबत घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. यानंतर स्वत: आरोपी पोलिसांसमोर सरेंडर झाला. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.
हे ही वाचा : Astrology : कन्या राशीत बुध ग्रह सक्रीय, 26 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींची होणार चांदी
पोलीस आरोपीची चौकशी करत असून घटनेचा तपास करत आहेत. द्याप हत्येमागील हेतू जाहीर केलेला नाही किंवा आरोपीच्या आत्मसमर्पणाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT












