Crime News : टेलिग्रामवर सेलर हब 01 असा ग्रुप बनवून त्या ग्रुपच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाठवले गेले. ते व्हिडिओ अपलोड, डाउनलोड करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिला न्यायालयात हजर केले जाईल आणि नंतर तुरुंगात पाठवण्यात येईल अशी माहिती आहे. ही घटना फिरोजाबाद राजावली पोलीस ठाणे परिसरातील आहे. आरोपी महिलेची पूजा माथूर (वय 29) अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दारूच्या नशेत सात वर्षांच्या चिमुकलीचा खून, नऊ दिवसानंतर हत्याकांडाचा उलगडा
महिलेकडून परदेशी आणि भारतीय मुलांचे अश्लील व्हिडिओंची विक्री
शहर पोलीस अधीक्षक रवी शंकर प्रसाद यांनी या प्रकरणी सांगितलं की, आरोपी महिलेच्या या कृत्याचा लखनौ येथील सायबर सेलच्या माध्यमातून माग काढला होता. अशातच जिल्हा सायबर पोलीस आणि राजावली पोलीस ठाण्याने प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. या तपासातून आरोपी महिला पूजा माथूर ही देशातील आणि परदेशातील मुलांचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन विकत होती. या अवैध व्यवसायात ती अडकून बसली होती.
एका व्हिडिओसाठी 100 ते 500 रुपये आकारले गेले
पोलिसांनी पूजाची चौकशी सुरू केली असता, महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली. ती एका व्हिडिओसाठी 100 ते 500 रुपये आकारत होती. महिलेनं सांगितलं की, तिने तिच्या पतीला सोडले असून ती तिच्या माहेरीच राहते. पोलीस या प्रकरणात लक्ष घालत असून त्यांनी मोबाइल डेटा, बँकेची खाती आणि टेलिग्रामशी संबंधित इतर संशस्यास्पद ग्राहकांची कसून चौकशी करत आहे. केवळ पूजा माथूर आहे की, यामध्ये इतर कोणाचा समावेश आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
पूजाने आपल्या भावांना देखील आपल्या मोबाइलला हात लावू दिला नाही. तिने आपल्या मोबाइलवर लॉक ठेवले. तिच्या फोनजवळ कोण गेलं तर ती वाद घालायची. कुटुंबीयांनी मोबाइल तिचा वैयक्तिक असल्याचे ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. मात्र, तिच्या इंटरनेटच्या माध्यमातून किळसवाणे जाळे विणले गेल्याचे दिसून येते.
हे ही वाचा : नवरा अजारी असल्याचे कारण सांगितलं, बंगल्यावर नेत केले लैंगिक अत्याचार
याच प्रकरणात पोलिसांनी पूजा माथूरला अटक केली असून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले. या घटनेची माहिती मिळताच, पूजाचा भाऊ, आई-वडील भयभीत होऊन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांनी पूजाच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ते देखील हादरून गेले होते. ती नेमकी कोणाच्या खात्यात पैसे पाठवते याचा तपास पोलीस करताहेत.
ADVERTISEMENT












