दारूच्या नशेत सात वर्षांच्या चिमुकलीचा खून, नऊ दिवसानंतर हत्याकांडाचा उलगडा

मुंबई तक

Crime News : दारूच्या नशेत एकाने अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीचा खून केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दारूच्या नशेत एकाने अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीचा केला खून

point

नवव्या दिवशी प्रकरण उघडकीस

Crime News : दारूच्या नशेत एकाने अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीचा खून केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्याची घटना आहे. या घटनेनंतर नऊ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ही घटना बिहारच्या जमुई येथे 28 ऑगस्ट रोजी घडली. 

हे ही वाचा : नवऱ्याने बायकोचे केले तुकडे, नंतर फ्रीजमध्ये लपवून ठेवलं डोकं; दार उघडताच भयंकर

नेमकं काय घडलं? 

चिमुरडी ही सायंकाळी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हा तिच्यासोबत असं काही होईल हे तिला आणि तिच्या कुटुंबियांना वाटलं नाही. ती बराच वेळ झाल्यानंतरही परतली नाही. संबंधित प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला होता. त्यांनी आजूबाजूचा परिसर आणि ओळखीच्या घरी तिचा शोध सुरू केला. 

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट रोजी नीमरंग परिसरात एक अर्धवट बांधलेल्या घराच्या हद्दीजवळ मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणात जमुईचे प्रभारी एसडीपीओ आणि सायबर डीसीपी, अभिषेक कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली होती. काही दिवसांचा तपास केल्यानंतर त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

नवव्या दिवशी आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश

अटकेत आलेल्यांची ओळख मोहम्मद सरफरा आणि तनवीर अशी समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान, या हत्या प्रकरणात जुमई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या घटनेच्या दिवसांपासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी छापे देखील टाकण्यात आले होते, तसेच नवव्या दिवशी पोलिसांना आरोपीला पकडण्यास यश आले.