सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम, खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली, काय घडलं?

मुंबई तक

• 11:09 AM • 08 Sep 2026

एका व्यावसायिकाची तिच्या सुनेने सुपारी देऊन हत्या केली. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. कानपूरमधील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या सविस्तर.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम

point

खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली

point

काय घडलं?

Crime News : औषध व्यावसायिक विपिन मिनोचा यांच्या शनिवार (5 सप्टेंबर) रात्री झालेल्या निर्घृण हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मिनोचा यांची सून शालू हिनेच मालमत्तेच्या हव्यासापोटी 6 लाख रुपयांची सुपारी देऊन जुना नोकर विशाल गौतम याच्याकडून ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चकमकीनंतर मुख्य आरोपी विशाल व त्याच्या साथीदारासह कट रचणाऱ्या सुनेला रविवारी अटक केली असून, सोमवारी तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

'अशी' केली हत्या

तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, सासऱ्यांच्या संपत्तीवर डोळा असलेल्या शालूने आरोपींना पकडले गेल्यास तिच्या पतीचे नाव सांगण्याची सूचना दिली होती. सुरुवातीला आरोपींनी विपिन मिनोचा झोपल्यानंतर उशीने तोंड व नाक दाबून त्यांची हत्या करण्याचा आणि त्यास हृदयविकाराचा झटका दाखवण्याचा कट रचला होता. त्यासाठी 15 दिवसांपूर्वीच शालूने फ्लॅटची डुप्लिकेट चावी आरोपींना बनवून दिली होती. मात्र घटनेच्या रात्री आरोपी बेडरूममध्ये लपलेले असताना मिनोचा यांनी अचानक तिथे येऊन लाईट चालू केल्याने, ओळख उघड होण्याच्या भीतीपोटी आरोपींनी चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली.

हे ही वाचा : ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात...

एकमेव वारस असूनही पगारावर ठेवला

या कटामागील मुख्य कारणांचा शोध घेतला असता, पती सुब्रत हा कुटुंबातील एकमेव मुलगा असूनही सासरे त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वागणूक देत व केवळ 35 हजार रुपये महिना पगार देत असल्याचे शालूने सांगितले. तसेच घर खर्चासाठी तिला केवळ 10 हजार रुपये देऊन त्याचाही हिशोब मागितला जात असे. संपूर्ण घरावर आणि तिच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सासऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते, असा आरोप तिने केला.

हे ही वाचा : MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांनी लिहिलेले पोस्टर, VIDEO पाहाच

सुरक्षा रक्षकालाही केलं सामील

या गुन्ह्याचा उलगडा करण्यात सोसायटीच्या सुरक्षारक्षकाची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली. शालूने सुरक्षारक्षकाला विशाल आल्यास नोंदवहीत त्याची नोंद न करण्यास सांगितले होते, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दिसत असल्याचे समोर आल्यानंतर सुरुवातीला शालूनेच विशालला ओळखले होते; परंतु पोलिसांनी बारकाईने तपास केला असता तिचाच खरा चेहरा समोर आला. सध्या पोलीस या प्रकरणात विपिन मिनोचा यांच्या मुलाचा काही सहभाग आहे का, या दिशेनेही तपास करत आहेत.