शिवेंद्रसिंह राजे यांचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

• 08:06 PM • 08 Sep 2026

Shivendrasingh Raje Bhosale Viral Photo : भाजप खासदार शिवेंद्रसिंह राजे यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच फोटोबाबत शिवेंद्रसिंह राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Shivendrasingh Raje Bhosale Viral Photo

Shivendrasingh Raje Bhosale Viral Photo

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजप खासदार शिवेंद्रसिंह राजे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

point

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पोस्ट

Shivendrasingh Raje Bhosale Viral Photo : देशभरात नुकताच दहिहंडी हा सण साजरा करण्यात आला. या दहिहंडी सणादरम्यान, ठिकठिकाणी गोविंदा पथकांच्या मनोरंजनासाठी नृत्यांगणांना बोलावण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून नाच करून घेण्यात आला होता. काही नृत्यांगणांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. अशातच भाजप खासदार शिवेंद्रसिंह राजे यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच फोटोबाबत शिवेंद्रसिंह राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पोस्ट जशीच्या तशी 

पोस्टमध्ये शिवेंद्रसिंह राजे यांनी नमूद केलं की, "सदरच्या अकाउंट वरून माझे फोटो AI द्वारे मॉर्फ करून सदरची पोस्ट केली गेली आहे. हे फक्त माझी राजकीय बदनामी करण्यासाठी केले जात आहे. मॉर्फ केलेल्या फोटोंचा आणि सातारा येथे झालेल्या कार्यक्रमाचा काहीही संबंध नाही हे वास्तूस्तिती पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. त्यामुळे असे चुकीचे फोटो एकत्र जोडून, मॉर्फ करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करून बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जात आहे. असे चुकीचे फोटो टाकून बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटला Tag, Report आणि block करा", असं म्हणत त्यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे. 

हे ही वाचा : घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातून चालवल्या जाणाऱ्या पक्षाला अब्जावधींची देणगी

संबंधित फोटो आपला नसल्याचे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमाचा आणि आपला काहीही एक संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वस्तूस्थिती पाहिल्यानंतरच याबाबत स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. चुकीचे फोटो बनवून सोशल मीडियावर बदनामी केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जणार आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. संबंधित फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.