फसवणूक, तीन लग्न; नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियावर गंभीर आरोप

मुंबई तक

07 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:58 AM)

Nawazuddin Siddiqui’s Wife Aaliya : नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui Indian actor) पत्नी आलिया सिद्दीकी (Aalia Siddiqui) अलीकडेच चर्चेत आली जेव्हा तिच्या वकिलाने आलियावर नवाजच्या घरात अत्याचार होत असल्याचे सांगितले. नवाजची आई तिला जेवण देत नाही आणि नवाज तिचा फोन घेत नाही. मात्र, नवाजुद्दीनने कधीही त्याच्या लग्न किंवा पत्नीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. Serious allegations […]

Mumbaitak
follow google news

Nawazuddin Siddiqui’s Wife Aaliya : नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui Indian actor) पत्नी आलिया सिद्दीकी (Aalia Siddiqui) अलीकडेच चर्चेत आली जेव्हा तिच्या वकिलाने आलियावर नवाजच्या घरात अत्याचार होत असल्याचे सांगितले. नवाजची आई तिला जेवण देत नाही आणि नवाज तिचा फोन घेत नाही. मात्र, नवाजुद्दीनने कधीही त्याच्या लग्न किंवा पत्नीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. Serious allegations against Nawazuddin Siddiqui’s wife

हे वाचलं का?

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीनवर बायकोने केले गंभीर आरोप!

आता नवाजुद्दीन सिद्दीकीचे माजी वकील नदीम जफर जैदी यांनी पत्रकार परिषदेद्वारे नवाजच्या लग्नाची सत्यता सांगितली. त्यांनी दावा केला की, स्व:ताला नवाजची बायको म्हणणारी आलिया सिद्दीकी उर्फ ​​अंजली उर्फ ​​गायत्री उर्फ ​​कामाक्षा उर्फ ​​जैनब उर्फ ​​अंजना पांडे, जबलपूरची रहिवासी आहे. म्हणजेच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक बेकायदेशीर गोष्टी करणारी ती महिला आहे, असं ते म्हणाले.

आनंद किशोर पांडे यांची मुलगी अंजना किशोर पांडे असे या मुलीचे खरे नाव असल्याचा दावा झैदी यांनी केला आहे. अंजनाचा जन्म 18 एप्रिल 1979 रोजी झाला होता, परंतु तिच्या पासपोर्टवर तिचे वय 18 एप्रिल 1982 असे दाखवण्यात आले आहे. अंजनाचा विवाह 28 एप्रिल 2001 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी विनय भार्गव यांच्याशी झाला होता, जो रेल्वे विभागात तिकीट कलेक्टर आहे. विनय भार्गवशी विवाहित असूनही, अंजना पांडेने मार्च 2010 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीशी झैनबच्या रुपात लग्न केले, तर अंजना आणि विनय भार्गव यांचा घटस्फोट झाला नाही.

झैदी पुढे सांगतात, एप्रिल 2011 मध्ये आलियाचा नवाजसोबत घटस्फोट झाला होता. यासोबतच एका फेसबुक यूजरच्या पोस्टनुसार, अंजनाने 2008-2009 मध्ये राहुल नावाच्या व्यक्तीसोबत दुसरा प्रेमविवाह केला होता आणि दोघेही मुंबईतील गोरेगाव येथे एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. यामध्ये अंजनाच्या बहिणीचाही समावेश आहे. मुंबईत राहून अंजना पांडे आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करत होती, तर जबलपूरमध्ये विनय भार्गवने अंजनाच्या बहिणीशी लग्न केले.

Nawazuddin Siddiqui : लाल साडी, कानात झुमके अन्…, नवाजुद्दीनचे दिलखेच अंदाज

अर्चना भार्गव या आधीच राजकुमार शुक्ला यांची पत्नी असून दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. विनय भार्गवने अंजनाचे नावही पत्नी म्हणून रेल्वे विभागात नोंदवले आणि त्यानंतर अर्चनासोबत लग्न करून तिचे नाव रेल्वे विभागात नोंदवण्याचा प्रयत्नही केला. ही बाब रेल्वे खात्याच्या नोंदींच्या तपासणीत समोर आली. तिघांनी मिळून रेल्वे विभागाचीही फसवणूक करून रेल्वे सुविधांचा लाभ मिळवला. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, असं झैदी म्हणाले.

    follow whatsapp