श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू भोसलेंचं निधन, उदयनराजे-शिवेंद्रसिंह राजेंचं वैर संपवण्यात मोठा वाटा

मुंबई तक

• 02:20 PM • 13 Sep 2022

सातारा: शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत […]

Mumbaitak
follow google news

सातारा: शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध काम केली.

हे वाचलं का?

उदयनराजे-शिवेंद्रसिंह राजेंचं वैर संपवण्यात मोठा वाटा

सातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला हे सातारकर कधीच विसरू शकत नाहीत. त्यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य जे आजपर्यंत चालू आहे त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदिर करंजे यांचे ते कार्याध्यक्ष होते.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेले 75 वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते तो आदालत वाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम म्हणतात.

    follow whatsapp