Sharad Pawar: अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेऊ: शरद पवार

मुंबई तक

• 08:48 AM • 21 Mar 2021

नवी दिल्ली: ‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: ‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल देशमुख यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ.’ शरद पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, याचवेळी शरद पवार असंही म्हणाले की, ‘चौकशीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा.’ त्यामुळे आता शरद पवारांनी यासंबंधी चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे टोलवला आहे.

‘परमबीर सिंगांनी केलेले आरोप गंभीर पण…’

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांविषयी देखील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पत्रावर परमबीर सिंग यांची सही नाही. 100 कोटींच्या वसुलीचे आरोप देखील गंभीर आहेत. पण पत्रात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेले नाही की, हे पैसे कसे दिले आहेत. खरं तर परमबीर यांची मुंबईच्या आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी यासंबंधी आरोप का केले नाही किंवा पत्र का लिहलं नाही?’ असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

‘वाझेंना परमबीर सिंग यांनीच पुन्हा पोलीस दलात घेतलं होतं…’

याचवेळी शरद पवार यांनी हे देखील स्पष्ट केलं की, सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाच होता. ‘हा निर्णय मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा नव्हता. मनसुख यांची गाडी वाझेंनी घेतली होती आणि त्यात स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा.’

‘तसंच या प्रकरणाची चौकशी निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी असं मी मुख्यमंत्र्यांना सुचवणार आहे.ते स्वीकारलं जाईल की नाही मला ठाऊक नाही. मी फक्त याबाबत मुख्यमंत्र्यांना सुचवू शकतो. त्याविषयी निर्णय तेच घेतील.’ असंही पवार म्हणाले.

महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?-फडणवीस

‘सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण…’

याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांना सरकार अस्थिर केलं जात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवार असं म्हणाले की, ‘सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण त्यात त्यांना यश येणार नाही.’ असं म्हणत पवारांनी अद्यापही सरकार मजबूत असल्याचा दावा केला आहे.

‘मुख्यमंत्री गृहमंत्र्यांविषयी नेमका निर्णय घेतील’

‘दरम्यान, या पत्रकार परिषदेआधी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे तेच अनिल देशमुखांच्या गृहमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. उद्यापर्यंत हा निर्णय घेतला जाईल. याविषयी आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. पण त्याआधी गृहमंत्र्यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ.’

‘परमबीर सिंग हे बदलीच्या आधी मला भेटले होते. मला त्यांनी माझ्यावर अन्याय होतो आहे हे स्पष्ट केलं होतं. माझ्या काही निर्णयांमध्ये राजकीय ढवळाढवळ होत होती असंही त्यांनी मला सांगितलं होतं मात्र अनिल देशमुख यांचं थेट नाव घेतलं नव्हतं.’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत एक ते दोन दिवसात निर्णय घेऊ असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार

पाहा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • अनिल देशमुखांबाबत आम्ही उद्यापर्यंत निर्णय घेऊ, सर्वांशी बोलून निर्णय घेतला जाईल.

  • याआधी गृहमंत्र्यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ

  • सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्यात यश येणार नाही

  • अनिल देशमुखांच्या गृहमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील

  • पत्रकार परिषदेआधी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

  • दरम्यान, याप्रकरणाची चौकशी निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी असं मी सुचवत आहे. ते स्वीकारलं जाईल की नाही मला ठाऊक नाही. मी फक्त याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो. त्याविषयी निर्णय तेच घेतील.

  • फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ‘हे’ पत्र समोर आलं आहे.

  • मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा.

  • चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत.

  • मनसुख यांची गाडी वाझेंनी घेतली होती आणि त्यात स्फोटकं ठेवली

  • 100 कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही

  • मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा निर्णय नाही

  • वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच

  • बदलीनंतर परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहलं आहे.

  • परमबीर यांच्याशी माझी भेट झाली होती.

  • पण पत्रात लिहलं नाही की, पैसे कसे दिले

  • 100 कोटींच्या वसुलीचे आरोप हे गंभीर आहेत.

  • पण ‘त्या’ पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही

  • परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर

  • एक गृहमंत्र्यांवरील आरोप आणि दुसरं डेलकरांचं प्रकरण

  • परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत.

  • शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु

    follow whatsapp