Goa Politics: गोव्यात कॉंग्रेस फुटली; माजी मुख्यमंत्र्यांसह 8 आमदार अखेर भाजपाच्या वाटेवर

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. गोवा भाजप हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा काँग्रेस देशभरात ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते देशभरात 150 दिवसांचा 3,570 […]

Mumbai Tak

मुंबई तक

14 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

follow google news

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. गोवा भाजप हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा काँग्रेस देशभरात ‘काँग्रेस जोडो यात्रा’ काढत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते देशभरात 150 दिवसांचा 3,570 किमीचा प्रवास करत आहेत. ही यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे.

हे वाचलं का?

हे काँग्रेसचे आठ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

40 विधानसभेच्या जागा असलेल्या गोव्यात या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 11 आमदार होते. यापैकी भाजप आघाडीचे (NDA) 25 आमदार आहेत. त्याचवेळी काँग्रेसकडे 11 आमदार आहेत. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी 11 पैकी 8 आमदार आपल्या पक्षात सामील होणार असल्याचा दावा केला आहे. दिगंबर कामत, मायकल लोबो, देलीला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फलदेसाई, संकल्प आमोणकर, अॅलेक्स सिक्वेरा ही आठ नावं समोर आली आहेत.

जुलैमध्येही होती अशीच चर्चा

मार्चमध्ये गोव्यात सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा अशी गोष्ट होत आहे. याआधी जुलैमध्ये काँग्रेसच्या 11 पैकी 5 आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने योग्य वेळी सक्रियता दाखवून हे बंड थांबवले होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक आणि दलीला लोबो यांनी बंडखोरी केल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने मायकेल लोबो यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरून हटवले होते.

2019 मध्येही फुटली होती काँग्रेस

काँग्रेस फुटीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गोव्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2017 मध्ये काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र 13 जागा असूनही आघाडी सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले होते. 2019 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला, जेव्हा पक्षाचे 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. यानंतर आणखी 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    follow whatsapp