काँग्रेसकडून संघाच्या पेटलेल्या गणवेशाचा फोटो शेअर, भाजप म्हणतं “आग लावणं ही तर…”

मुंबई तक

• 09:48 AM • 12 Sep 2022

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, आरएसएसच्या पोशाखाबाबत काँग्रेसने ट्विट केल्याने भाजपचे नेते भडकले आहेत. अगदी शीख दंगली ते मुंबई दंगलीचा संदर्भ देत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला आग लावण्याची जुनी सवय असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत 145 दिवस उरलेत असं देखील […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, आरएसएसच्या पोशाखाबाबत काँग्रेसने ट्विट केल्याने भाजपचे नेते भडकले आहेत. अगदी शीख दंगली ते मुंबई दंगलीचा संदर्भ देत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला आग लावण्याची जुनी सवय असल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत 145 दिवस उरलेत असं देखील लिहलं आहे.

हे वाचलं का?

नेमकं काँग्रेसकडून काय ट्विट करण्यात आलंय ?

दरम्यान, आज काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत आरएसएसचं गणवेश पेटताना दिसत आहे. त्यात धूरही उठताना दिसत आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “आम्ही देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहोत.” आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत. असं त्यात लिहलं आहे.

भाजपने साधला निशाणा

काँग्रेसच्या या ट्विटनंतर भाजप नेते आक्रमक झाले. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लिहिले, “देश जाळण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे. 1984 ची दंगल असो, जळगाव, मुंबई, हाशिमपुरा, भागलपूर किंवा मेरठ असो. ही यादी मोठी आहे. त्यांनी पुढे लिहिले की, राजीव गांधींनी 1984 च्या दंगलीचे समर्थन कसे केले हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले, काँग्रेस फक्त देश जाळण्याचा विचार करते.

गिरिराज सिंह यांनीही प्रत्युत्तर दिलं

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, काँग्रेसचा हा खानदानी व्यवसाय आहे. एकतर देश तोडायचं किंवा देश जाळून टाकायचं. काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले योगी सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, राजकीय मतभेद असतील पण राजकीय विरोधकांची पोळी भाजण्यासाठी कोणत्या मानसिकतेची गरज आहे? या नकारात्मकतेच्या आणि द्वेषाच्या राजकारणाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

    follow whatsapp