Suicide Case: एका 42 वर्षीय पुरूषाने त्याच्यावर आरोप असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने मृत व्यक्तीवर लोकल बसमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप केला असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नैराश्यात त्याने रविवारी सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव दीपक असून तो कोझीकोडे शहरातील गोविंदपुरम येथील रहिवासी होता. सकाळी 7 वाजताच्या सुमारास दीपकचे आई-वडील त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावत होते. मात्र, खोलीतून त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर, कुटुंबियांनी त्याच्या फोनवर बरेच कॉलसुद्धा केले, पण त्यांनाही त्याचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, कुटुंबियांना त्याची चिंता वाटू लागली आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. परंतु, त्यावेळी फाशीला लटकलेल्या अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळला.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी! ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... लवकर करा अप्लाय
लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला व्हिडीओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण हा प्रचंड मानसिक तणावातून जात होता. दीपकने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आणि त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याला 20 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला. व्हिडीओमध्ये संबंधित महिलेने आरोप केला की, पय्यन्नूर रेल्वे स्टेशन ते बस स्टँडला जाणाऱ्या एका लोकल बसमधून प्रवास करताना दीपकने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
हे ही वाचा: वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातच मुलाची निर्घृण हत्या! थेट घरात घुसून गुंडांचा हल्ला अन्...
तसेच, पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे दीपकला खूप त्रास झाला आणि परिणामी तो मानसिक तणावात गेला. या नैराश्यात असह्य होऊन शेवटी त्याने टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, मृत तरुणावर लैंगिक छळाचा आरोप केलेल्या महिलेची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नसल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











