प्रेम विवाह केला पण पत्नीचे इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर गळा दाबून संपवलं

UP Crime News : फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी सचिन सिंह आणि श्वेता सिंह यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी चार महिन्यांपूर्वी कोर्टात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर सुरुवातीला दोघे गुजरातमध्ये राहत होते. त्यानंतर ते कानपूरला आले आणि गेल्या एक महिन्यापासून महाराजपूर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.

UP Crime News

UP Crime News

मुंबई तक

20 Jan 2026 (अपडेटेड: 20 Jan 2026, 10:04 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रेम विवाह केला अन् पत्नीला 4 महिन्यांनंतर गळा दाबून संपवलं

point

इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांसोबत रंगेहात पकडलं

Crime News : कानपूरच्या महाराजपूर परिसरातून एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध, कोर्टात लग्न, पण चार महिन्यांनंतर हत्या 

फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी सचिन सिंह आणि श्वेता सिंह यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी चार महिन्यांपूर्वी कोर्टात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर सुरुवातीला दोघे गुजरातमध्ये राहत होते. त्यानंतर ते कानपूरला आले आणि गेल्या एक महिन्यापासून महाराजपूर परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.

हेही वाचा : .'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला

अधिकची माहिती अशी की, कानपूरमध्ये आल्यानंतर सचिन सिंह ऑटो रिक्षा चालवण्याचे काम करू लागला. त्याने एका अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील इमारतीत खोली भाड्याने घेतली होती. त्या इमारतीत तसेच आजूबाजूच्या परिसरात अभियांत्रिकीचे अनेक विद्यार्थी वास्तव्यास होते. सचिनच्या म्हणण्यानुसार, तो ऑटो चालवण्यासाठी बाहेर जात असताना श्वेताचे इतर तरुणांशी संबंध निर्माण झाल्याचा त्याला संशय होता. या संशयामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले आहे. शुक्रवारी रात्री सचिन अचानक घरी परतला. त्यावेळी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर त्याला पत्नी श्वेता दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसोबत पलंगावर झोपलेली दिसली. हे दृश्य पाहून सचिनचा संतापला. यानंतर खोलीत जोरदार वाद झाला. या वादादरम्यान श्वेताने त्या तरुणांकडून सचिनला मारहाण करवून घेतल्याचा दावा आरोपीने पोलिसांसमोर केला आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुणीतरी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे सचिनने समझोत्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र, घरी परतल्यानंतर श्वेताने पकडण्यात आलेल्या तरुणांची सुटका करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. याच कारणावरून पुन्हा एकदा दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादातूनच संतप्त झालेल्या सचिनने श्वेताचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खोलीत गुंडाळलेला श्वेताचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आरोपी सचिन सिंह याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

श्रवण दास महाराजाचा कारनामा! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    follow whatsapp