'तो सतत मला परपुरुषाशी...' पत्नीनं त्रासाला कंटाळून दोघांच्या मदतीनं पतीचा काढला काटा, मृतदेह रेल्वेरुळावर फेकला

crime news : पत्नीने आपल्याच पतीची निर्घृण हत्या केली. त्याच मृत पतीचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळून आल्याचं सांगण्यात येत होतं. मृतदेहाचे डोके गायब झाले असता, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताच्या पत्नीच्या सांगण्यावरून हल्लेखोरांनी ही संपूर्ण घटना घडवून आणली असं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पत्नीनं नेमकं असं का केलं याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

19 Jan 2026 (अपडेटेड: 19 Jan 2026, 09:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तो सारखं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवायला लावत होता

point

पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले

point

महिलेनं दोघांना हाताशी धरून 'त्याचा' काटा काढला

Crime news : छत्तीसगडमधील बालोदाबाजारमधील भोठीडीह गाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पत्नीने आपल्याच पतीची निर्घृण हत्या केली. त्याच मृत पतीचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळून आल्याचं सांगण्यात येत होतं. मृतदेहाचे डोके गायब झाले असता, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताच्या पत्नीच्या सांगण्यावरून हल्लेखोरांनी ही संपूर्ण घटना घडवून आणली असं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला

पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पुरुषावर तलवारीने हल्ला करत शिर धडापासून वेगळे केले. त्यानंतर ते धड रेल्वेरुळावर फेकण्यात आले होते, तर मृतदेहाचे शिर हे दुसऱ्या ठिकाणी नेऊन जमिनीत पुरण्यात आले होते, ही घटना हातबंद पोलीस ठाणे परिसरात घडली होती. या प्रकरणातील मृताचे नाव गस कुमार जोशी (वय 39) असे आहे. तर पत्नीचं नाव कुसुम जोशी असे आहे.  

तो सारखं अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवायला लावत होता

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती बराच काळ मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. नंतर तिने आरोप केला की, तो तिला इतरांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास दबाव आणत होता. याच त्रासाला कंटाळून पीडितेनं तिच्या पतीला संपवण्याचा निर्णय घेतला होता.

महिलेनं दोघांना हाताशी धरून 'त्याचा' काटा काढला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुमने तिचे मामा राजेश भारती यांची मदत घेत दारासिंग अनंत आणि करण अनंत या दोघांशी संपर्क साधून पतीचा काटा काढला. त्यासाठी 40 हजार रुपयांची सुपारी देऊन गस कुमार जोशीचा खेळ खल्लास केला. कुसुम तिच्या पतीला काहीबाही बहाण्याने तिच्या मामाच्या घरी घेऊन गेली होती. त्याच ठिकाणी दोघेजण उपस्थित होते. त्यांनी गस कुमारला दारू पाजली आणि नंतर बेदम मारहाण केली. नंतर तो बेशुद्ध पडला, त्याला एका गाडीत बसवले आणि सुमारे 20 किमी अंतरावर हातबंद-भाटपारा रेल्वे रुळावर नेले, नंतर तलवारीने हल्ला करत मुंडकं छाटलं. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे शरीर रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. 

हे ही वाचा : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर

डोके सुमारे 10 किमी अंतरावर नेत जमिनीत गाडले

हा रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्याचे डोके सुमारे 10 किमी अंतरावर नेण्यात आले आणि जमिनीत गाडण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, हत्येवेळी पत्नी घटनास्थळी उपस्थित नव्हती, ती तिच्या मामाच्या घरी होती. तर मामा आणि दोन हल्लेखोर हे घटनास्थळीच होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा शोध घेतला होता. नंतर उजव्या मनगटावर असलेल्या इंग्रजी नावाच्या टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटली होती. जवळजवळ चार दिवसांचा तपास, शोध आणि चौकशीतून पोलिसांनी हत्येचा गुन्हा उलगडत पत्नीसह सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

    follow whatsapp