Karnataka DGP Viral video : बेंगलोरमधील गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील आरोपी रान्या रावचे वडील डीजीपी रामचंद्र राव यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे कर्नाटकमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राव यांच्याविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचे राव यांनी सांगितले आहे. ते सध्या बेंगलोर येथील नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : श्रवण दास महाराजाचा कारनामा! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
व्हिडिओत नेमकं काय आहे?
राव यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात खळबळ माजली आहे. यामध्ये राव हे सरकारी ऑफिसमध्ये आणि गणवेशात असल्याचे दिसून येत आहे. यामधील महिलेला मीठी मारत असताना आणि तिचे चुंबन घेत असताना ते दिसत आहेत. गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हि़डिओमुळे कर्नाटकच्या राजकीय आणि प्रशासकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ मॉर्फ असल्याचा राव यांचा दावा
इंडिया टुडेशी बोलताना राव यांनी सांगितले की, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. माझी बदनामी करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे घडवून आणले आहे. काही लोक मला जाणून-बुजून त्रास देत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिस खात्यातील शिस्त आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रसंगी महिला त्यांच्या कार्यालयात वेगवेगळे कपडे घालून येत असत.
हे ही वाचा : पैसा-पाणी: IT कंपन्यांनी नोकऱ्या देणे का केलं बंद?
कर्नाटकचे मुख्यमंत्री संतापले
या प्रकरणामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या संतापले आहेत. या प्रकरणाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली असून राव यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील आरोपी रान्या रावचे ते वडील असल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या नैतिकतेविषयी प्रश्न विचारले जात आहेत.
ADVERTISEMENT











