7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, न्यायालयाचे ऐतिहासिक पाऊल, 'इतक्या' दिवसांतच सुनावला मृत्यूदंड

Gujrat Girl Rape case : गुजरातच्या राजकोटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 7 वर्षाच्या मुलीवर निर्भया प्रकरणाप्रमाणे अत्याचार करणाऱ्या नराधमाला राजकोट स्पेशल कोर्टाने अत्यंत कमी कालावधीत निकाल देऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गुन्हेगाराने कानपर गावात 7 वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रकरणाप्रमाणेच क्रूरता केली होती.

Mumbai Tak

मुंबई तक

18 Jan 2026 (अपडेटेड: 18 Jan 2026, 03:22 PM)

follow google news

Gujrat Girl Rape case : गुजरातच्या राजकोटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 7 वर्षाच्या मुलीवर निर्भया प्रकरणाप्रमाणे अत्याचार करणाऱ्या नराधमाला राजकोट स्पेशल कोर्टाने अत्यंत कमी कालावधीत निकाल देऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गुन्हेगाराने कानपर गावात 7 वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रकरणाप्रमाणेच क्रूरता केली होती. न्यायालयाने या प्रकरणात जलदगतीने कारवाई केली आणि 43 दिवसांत निकाल दिला. या निर्णयामुळे मुली आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : भाजप खासदाराच्या घरी चोरी, डुप्लिकेट चाव्यांनी तिजोरी उघडून रोकड केली लंपास

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुजरातमधील कानपरमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. 4 डिसेंबर 2025 रोजी ही घटना घडली. एका शेतमजुराची सात वर्षांची मुलगी बाहेर खेळत असताना आरोपी रेमसिंग दुडवाने तिला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातला. यानंतर त्याने तिथून पलायन केले. ही घटना समजताच सगळीकडे खळबळ माजली आणि या घटनेची तुलना दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी केली जाऊ लागली. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली.

आरोपीला पकडण्यासाठी गोळीबार

घटनेनंतर चारच दिवसात, 8  डिसेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र यासाठी त्यांना आरोपीवर गोळीबार करावा लागला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना त्याच्या पायावर गोळी घालावी लागली. यानंतर फक्त 11 दिवसांतच पोलिसांनी सर्व पुराव्यांसह न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

हे ही वाचा : धाराशिव : सावत्र आईला मुल झाल्यास संपत्तीत वाटेकरी येण्याची भीती, 17 वर्षीय मुलाने केला बापाचा खून

न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

राजकोट स्पेशल कोर्टाने या प्रकरणी जलदगतीने कार्यवाही करत फक्त 43 दिवसांतच आरोपीला फाशीची सजा सुनावली. 7 वर्षाच्या मुलीवर केलला अत्याचार हा अक्षम्य असल्याचे कोर्टाने निकाल देताना सांगितले. गुजरातमध्ये गेल्या काही वर्षात अशा प्रकरणांमध्ये 100 दिवसांच्या आतच कार्यवाही झाली आहे. यातून गुजरात सरकार आणि कोर्टाने महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नसल्याचा संदेश दिला आहे.

    follow whatsapp