Car Driver rapes woman : उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील साहिबाबादमध्ये एका महिलेच्या ड्रायव्हरनेच त्या महिलेसोबत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ करुन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला आहे. यामध्ये ड्रायव्हरने त्याच्या मित्रालाही सामील करुन घेतले होते. तब्बल दोन महिने या महिलेवर अत्याचार करण्यात आले. याविषयी साहिबाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनेक आश्चर्यकारक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, राजकोट न्यायालयाचे ऐतिहासिक पाऊल, 'इतक्या' दिवसांतच सुनावला मृत्यूदंड
नेमकं घडलं काय?
साहिबाबाद येथील टीला मोड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ही पीडिता रहात होती. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी ड्रायव्हर तिच्यासाठी काम करत होता.दोन महिन्यांपूर्वी जेव्हा पीडिता अंघोळ करत होती तेव्हा ड्रायव्हरने अंघोळ करतानाचा तिचा व्हिडिओ शूट केला. यानंतर काही दिवसांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ड्रायव्हरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तब्बल दोन महिने तो पीडितेवर अत्याचार करत होता.यामध्ये त्याने आपल्या एका मित्रालाही सामील करुन घेतले. त्यानंतर दोघंही या महिलेवर अत्याचार करु लागले. बदनामीच्या भीतीपोटी ही पीडिता अत्याचार सहन करत राहिली.
'असे' समोर आले प्रकरण
15 जानेवारी रोजी ड्रायव्हरने जबरदस्तीने पीडितेला कारमध्ये बसवले. कारमध्ये त्याचा मित्रही होता. पीडितेचा आरोप आहे की वाटेत आरोपीने तिला नशायुक्त कोल्ड्रिंक दिले. त्यानंतर आरोपी तिला साहिबाबाद येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथे ती अर्धबेशुद्ध असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले. सततच्या धमक्यांना कंटाळून दोन दिवसानंतर पीडितेने आईसोबत साहिबाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : छावा समाजात फुट पाडणारा सिनेमा, पण त्याचा मुख्य उद्देश शौर्य..', A. R. Rahman यांचं वक्तव्य
पोलिसांच्या तपासणीत काय आढळले?
या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून ज्या हॉटेलमध्ये अत्याचार झाले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपी तिथे उपस्थित होते का हे तपासण्यासाठी गेट्स तसेच कॉरिडॉरमधील फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपी आणि पीडितेचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल अजून समोर आलेला नाही. मात्र अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
ADVERTISEMENT











