Goa Russian Girls Murder : गोव्यात दोन रशियन महिलांचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे देशभर खळबळ माजली असून याप्रकरणी मूळ रशियाचा असलेला एलेक्सी लियोनोव याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर झालेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. एलेक्सीने दावा केला आहे की त्याने अजून एका महिलेची हत्या केली असून ती आसामची असल्याचे त्याने सांगितले आहे. दरम्यान, एलेक्सी हा सिरियल किलर आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "बाय बाय डिकु, खुश राहा ..." प्रेयसीचा 'तो' मॅसेज अन् प्रियकराने संपवलं आयुष्य! दीड महिन्यांनंतर सापडली सुसाईड नोट
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोव्यातील अरंबोल येथील एका भाड्याच्या घरात 9 जानेवारी रोजी एलेना कस्थानोवा (37) या रशियन महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. एफआयआर नुसार, तिचे हात बांधून आरोपीने तिचा गळा चिरला. कस्थानोवा 24 डिसेंबर रोजी गोव्यात आली होती. ती गो-गो डान्सर होती आणि मोठे समारंभ आणि लग्नात डान्सचे कार्यक्रम करायची. हा तपास सुरु असतानाच पोलिसांना एलेना वानेएवा या दुसऱ्या रशियन महिलेचा एका बाथरुममध्ये मृतदेह सापडला. तिची हत्यादेखील पहिल्या हत्येप्रमाणेच झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. वानेएवा ही बबल परफॉर्मर आणि आर्टिस्ट होती.
'असा' सापडला आरोपी
तपास सुरु असताना काही साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे लियोनोवची पोलखोल झाली. कस्थानोवा आणि लियोनोवचा काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले.यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताचा लिओनेलने कबुली दिली. कस्थानोवा ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. तर वानेएवा हिच्यासोबत त्याचा पैशांवरुन वाद झाला होता.
हे ही वाचा : डॉक्टर संग्राम पाटलांना लंडनला जाण्यापासून रोखलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?
तिसरी हत्या कशासाठी?
चौकशीत आरोपीने तिसरी हत्या केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांची चिंता वाढली आहे. लियोनोवने सांगितले की, त्याने आसामच्या एका 40 वर्षीय महिलेचीही हत्या केली आहे. तिला नशेचे पदार्थ देऊन दांडक्याने मारुन तिचा खून केल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांनी 14 जानेवारी रोजी या महिलेचा मृत्यू अनैसर्गिक पद्धतीने झाल्याची नोंद करण्यात आली आहे. लिओनोवच्या जबाबानंतर तिचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी सांगितले की आरोपीने हत्या केल्याचे कबूल केले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. रशियन दूतावासाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











