Gangrape : बर्थडे पार्टीत मादक द्रव्य पाजलं आणि नंतर पाच जणांनी…

मुंबई तक

12 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 07:33 AM)

Gangrape Crime News : 16 वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor girl gang-raped) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीये. आरोपींनी अल्पवयीन मुलीला आधी मादक द्रव्य पाजलं आणि त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. हैदराबादमध्ये (hyderabad) ही घटना घडली असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यात एका मुलीचाही समावेश आहे. (Minor girl gang raped by Five youth […]

Mumbaitak
follow google news

Gangrape Crime News : 16 वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor girl gang-raped) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीये. आरोपींनी अल्पवयीन मुलीला आधी मादक द्रव्य पाजलं आणि त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. हैदराबादमध्ये (hyderabad) ही घटना घडली असून, पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यात एका मुलीचाही समावेश आहे. (Minor girl gang raped by Five youth in hyderabad)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या हैदराबादमध्ये ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. मात्र, पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

अल्पवयीन सामूहिक बलात्कार : नक्की काय घडलं?

छत्रीनाका भागात रात्रीच्या वेळी 16 वर्षीय मुलगी मेडिकलच्या दुकानात गेली होती. त्याच भागात राहणाऱ्या एका मुलीने पीडित मुलीला भाईगुडा परिसरातील मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत येण्यासाठी आमिष दाखवलं.

Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

बर्थडे पार्टीत गेल्यानंतर तरुणीसोबत आरोपींनी काय केलं?

त्या मुलीसोबत पीडिता मित्राच्या घरी गेले. तिथे सहा जण आधीच हजर होते. त्यानंतर ज्या मुलीने पीडितेला सोबत आणलं होतं, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेगळ्या रूममध्ये गेली. त्याचवेळी बाहेर असलेल्या पाच तरुणांनी पीडितेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्तीने मादक द्रव्य पाजलं. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. अत्याचार करत असताना पीडिता आरडाओरड करत होती, मात्र आजूबाजूच्या लोकांना घटनेची जाणीव होऊ नये म्हणून आरोपींनी मोठ्या आवाजात गाणी लावली होती.

Crime : पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध अन् हत्या, ‘असा’ झाला भांडाफोड!

पीडितेवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला सोडलं. पीडिता पहाटे तीन वाजता घरी पोहोचली. त्यानंतर तिने घडलेली सगळी घटना तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडिता आणि तिच्या आईने छत्रीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आणि तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. आरोपी 18 ते 21 वयोगटातील असून, पीडितेला घेऊन जाणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह तिच्या बॉयफ्रेंडलाही पोलिसांनी गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली.

Asaram Bapu Story : चहावाला ते रेपिस्ट, अशी आहे आसारामची खरी कहाणी

पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, मुलगी अल्पवयीन असल्यानं तिला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधान, पोस्को आणि अॅट्रोसिटी कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp