एशियन गेम्ससाठी निवड झाली अन् सगळंच संपलं! क्रीडा विश्वावर शोककळा

मुंबई तक

• 12:52 PM • 31 May 2026

24 वर्षीय पॅरा ॲथलीट चिराग त्यागी याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याच्या एका सहकारी खेळाडूनेच केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एशियन गेम्ससाठी निवड झाली अन् सगळंच संपलं!

point

क्रीडा विश्वावर शोककळा

Crime News : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 24 वर्षीय पॅरा ॲथलीट चिराग त्यागी याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साई कुंज परिसरात चिरागचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चिरागला अगदी जवळून गोळी मारण्यात आली होती, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आली. त्यावरून पोलिसांनी यश खटीक नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून, कडक चौकशी दरम्यान त्याने चिरागची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

हे वाचलं का?

..म्हणून केली हत्या

चिरागची हत्या करणारा आरोपी यश खटीक हा दुसरा कोणी नसून त्याचाच एक जुना सहकारी पॅरा ऑलिम्पिक खेळाडू निघाला. हे दोघेही 'ब्लाइंड कॅटेगरी' (दृष्टीहीन प्रवर्ग) अंतर्गत ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये एकत्र सराव करायचे. चौकशीत यशने सांगितले की, काही काळापूर्वी कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान चिरागने यशविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे यशचे क्वालिफिकेशन रद्द झाले आणि त्याला क्रीडा स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. याच अपमानाचा आणि करिअर उद्ध्वस्त झाल्याचा बदला घेण्यासाठी यशने पिस्तुलची व्यवस्था केली आणि संधी साधून चिरागचा हत्या केली.

हे ही वाचा : नागपूर : मॅट्रिमोनी ॲप, शारीरिक शोषण अन् 15 लाख; 31 वर्षीय महिला कशी अडकली?

एशियन गेम्ससाठी झाली होती निवड

मृत चिराग त्यागी हा गाझियाबादच्या मुरादनगर येथील बसंतपूर सैंथली गावचा रहिवासी असून तो देशातील आघाडीच्या उदयोन्मुख पॅरा खेळाडूंपैकी एक होता. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच बेंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले होते. या कामगिरीच्या जोरावर ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या पॅरा एशियन गेम्ससाठी त्याची निवड झाली होती. घरात आणि गावात त्याच्या या यशाचा मोठा जल्लोष सुरू होता. आपला मुलगा परदेशात तिरंगा फडकवणार या आनंदात त्याचे आई-वडील होते, मात्र नियतीने त्यांच्यावर हा भीषण प्रसंग आणला.

हे ही वाचा : चंद्रपूर : 'आईच्या प्रियकराने माझ्यावर..' 15 वर्षीय मुलीने सगळंच सांगितलं, काय घडलं?

हॉस्टेलला जातो म्हणून निघाला अन्...

चिराग बुधवारी (27 मे) सकाळी हॉस्टेलला जातो असे सांगून घरातून निघाला होता, पण बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीय काळजीत होते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चुलत भाऊ आशिष त्यागी याने चिरागची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. गाझियाबादचे पोलीस उपायुक्त धवल जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येसाठी वापरलेले पिस्तूल हस्तगत करण्यासाठी पोलिसांची पथके छापेमारी करत आहेत. तसेच या गुन्ह्यात यशसोबत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.