‘अगला नंबर बापू का’, सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

21 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

गायक सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या वडिलांना एका पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. त्या धमकीमध्ये लिहिले आहे – अगला नंबर बापू का. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सिद्धूच्या काही मित्रांनी त्यांना सांगितले की, इन्स्टाग्रामवर पाकिस्तानमधून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. याच पोस्टमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाचे […]

Mumbaitak
follow google news

गायक सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या वडिलांना एका पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. त्या धमकीमध्ये लिहिले आहे – अगला नंबर बापू का. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सिद्धूच्या काही मित्रांनी त्यांना सांगितले की, इन्स्टाग्रामवर पाकिस्तानमधून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. याच पोस्टमध्ये ही धमकी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

सिद्धू मुसेवालाचे वडील बालकोर सिंग यांच्याबाबत काय पोस्ट ?

इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे…अगला नंबर बापू का. या धमकीची माहिती मुसेवालाच्या वडिलांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरू आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानी अँगल येणं ही मोठी बाब आहे. यापूर्वी जो काही तपास झाला आहे, त्यात हे प्रकरण फक्त गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यापुरतेच मर्यादित आहे असं वाटत होते पण आता जर सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या तर हे प्रकरण पोलिसांसाठी अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते.

पंजाब पोलिसांनी सिद्धूच्या दोन्ही मारेकर्‍यांना अटारी येथे चकमकीत ठार केल्यावर मूसेवाला खून प्रकरणात नाट्यमय वळण आले. गुंड जगरूपसिंग रूपा आणि मनप्रीत सिंग पन्नू हे पोलीस चकमकीत ठार झाले. या चकमकीनंतर मृतांची ओळख पटवण्यासाठी 2 प्रत्यक्षदर्शींना अटारी येथे बोलावण्यात आले. हे दोन्ही प्रत्यक्षदर्शी तेच आहेत जे घटनेच्या वेळी सिद्धूसोबत थार कारमध्ये बसले होते. दोन्ही प्रत्यक्षदर्शींना गोळीबार करणाऱ्यांचे मृतदेह दाखवण्यात आला आणि मृतांची ओळख पटवली गेली.

दरम्यान सिद्धू मुसेवालाची मागच्या महिन्यात हत्या करण्यात आली. आपल्या गाडीतून चाललेला असताना अज्ञात हल्लेखोरांनी येऊन त्यांच्या गोळ्या झाडल्या. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिश्नोई गँगने सिद्धूच्या खुनाची जबाबदारी घेतली होती. सिद्धूची हत्या झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, भाजपचे नेते सिद्धूच्या कुटुंबाला भेटून गेले आहेत. आता सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांना आलेल्या धमकीने पुन्हा वातावरण तापले आहे.

    follow whatsapp